स्वानंद पाटील, प्रतिनिधी
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर (Somnath Suryawanshi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या आरोपांना भाजपा आमदार सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे. 'आव्हाड साहेब तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का? असा प्रश्न धस यांनी यावेळी विचारला. तसंच त्यांनी आव्हाडांचे वर्णन 'राष्ट्रीय संत' असं केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले धस?
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुरेश धस म्हणाले की, 'मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही बोललो पाच लाखाची मदत दहा लाखाची करून दिली आव्हाड साहेब तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का?
माझ्यासोबत दलित बांधव असतात, मला कळवळा दाखवायची गरज नाही.'
बदलापूर प्रकरणाची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेची वाहा करणारे कोणत्या मानसिकतेचे आहेत? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे भगिनी आहेत त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही . माझ्या मतदारसंघातला 95 टक्के दलित बांधव माझ्यासोबत आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांना का सोडलं? मुलानं केला खळबळजनक खुलासा )
'त्या' क्लिपची मोडतोड
अॅक्शन मोडमध्ये जेवढे पोलीस आहेत तेवढ्यांनाच सस्पेंड करा अशी माझी मागणी आहे. मी काय बोललो हे तुम्ही चेक करा. ती क्लिप मोडून तोडून व्हायरल केली आहे कुठेच नाहीत त्यांच्याbj कारवाई करू नका यामुळे पोलीस दलावर परिणाम होईल असे मी म्हणालो होतो. माझी भूमिका सौम्य झालेली नाही, मी भेटीगाठी वाला नाही मी कुणाच्या बापाला भीत नाही महादेव मुंडे प्रकरणात मुंडे यांच्या पत्नीची मागणी योग्य आहे पण त्यांनी थोडं थांबलं पाहिजे.
मी मागणी केल्यानंतर परळीतले दहा ते पंधरा लोक गायब आहेत.मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे या प्रकरणातील आरोपी बिन भाड्याच्या खोलीत गेले पाहिजेत. माझी भूमिका बदललेली नाही. संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुंडे प्रकरणात माझी भूमिका एकच आहे ज्यांनी यांचा जीव घेतलाय ते फासावर गेले पाहिजेत, ' असं धस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आव्हाडांचा आरोप काय?
यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणात आरोप केले होते. 'सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे... अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही,' अशी पोस्ट आव्हाड यांनी केली होती.
परभणी शहरातून तब्बल 400 किलोमीटर अंतर पार करत निघालेला हा मार्च नाशिकमध्ये संपला. विशेष दुत ह्यांनीं जाणीव पूर्वक हा लॉंग मार्च चिरडला सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे हा प्रश्न धसास लावणारा दलाल कोण ? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला होता.