स्मृती इराणींचे कमबॅक ते अमित मालवीयांची गच्छंती; भाजपाच्या नव्या कार्यकारिणीतील हायलाईट्स काय? वाचा सविस्तर

BJP National Team Announced: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या टीमची अधिकृत घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
BJP New Team: या नव्या रचनेमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे पुनरागमन झाले आहे.
मुंबई:

BJP National Team Announced: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या टीमची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या रचनेमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे पुनरागमन झाले असून काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत. आगामी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात विधानसभा निवडणुका तसेच 2029 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने युवा आणि महिला नेतृत्वावर भर दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

स्मृती इराणींचे कमबॅक

जून 2024 मधील केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ वर्तुळात स्मृती इराणी यांचे पुनरागमन झाले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर त्या केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या होत्या, मात्र आता नितीन नवीन यांच्या नव्या टीममध्ये त्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

अमित मालवीय यांची गच्छंती

या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे गेल्या 11 वर्षांपासून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख पद सांभाळणाऱ्या अमित मालवीय यांची गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता छत्तीसगडच्या दीपक म्हस्के यांची नवी आयटी सेलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, अनिल बलोनी यांनी मात्र आपले मीडिया इन-चार्ज हे पद कायम राखले आहे. याशिवाय, माजी राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे.

12 महिला नेत्यांचा समावेश

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 12 महिला नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी 6 महिला नेत्या आहेत, ज्यामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा समावेश आहे. आगामी काळातील महत्त्वाच्या राज्यांमधील निवडणुका लक्षात घेता महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने ही विशेष रणनीती आखली आहे. याशिवाय आप पक्षातून भाजपमध्ये आलेले संदीप पाठक यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आले असून केरळमधील के सुरेखण आणि अनिल अँटोनी यांनाही हीच जबाबदारी मिळाली आहे.

अनेक मोठ्या नेत्यांकडे नवीन जबाबदाऱ्या

ओडिशातील भाजप नेते संबीत पात्रा यांची ईशान्य भारताचे समन्वयक (कोऑर्डिनेटर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव आणि राजस्थानचे नेते सतीश पुनिया यांनाही नितीन नवीन यांच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. तर बी. एल. संतोष हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून आपले काम कायम ठेवतील. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनलेल्या नितीन नवीन यांनी पक्षाचा अनुभव आणि तरुण रक्ताचा समतोल साधत ही नवी टीम तयार केली आहे.
 


Topics mentioned in this article