रणजितसिंह मोहिते पाटलांवरील ठपका दूर? भाजपा प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक! पत्र Viral

Ranjitsingh Mohite Patil : आमदार रणजित सिंह मोहिते पाटलांवरील भाजपाचा राग मावळला आहे का? अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरु झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

राज्यात मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं. विधानसभा निवडणुकीत भाजपा नंबर 1 चा पक्ष ठरला. पण, सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात तत्कालीन भाजपा आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला होता. तसंच त्यापूर्वी त्या भागातील माढा लोकसभा मतदारसंघातही भाजपाला पराभव सहन करावा लागला.

यो दोन्ही निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाला पक्षाचे विधान परिषद आमदार रणजिंत सिंह मोहिते पाटील जबाबदार असल्याचा मत भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं होतं. राम सातपुते यांनी तर तशी उघड तक्रारही केली होती. त्यानंतर रणजित सिंह मोहिते पाटलांना पक्षानं कारणे दाखवा नोटीसही बजावली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पण, याच रणजित सिंह मोहिते पाटलांवरील भाजपाचा राग मावळला आहे का? अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजित सिंह मोहिते पाटलांचं कौतुक लेखी पत्रातून केलं आहे. 

भाजपाची 1 हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल बावनकुळे यांनी हे कौतुक केलं आहे.' आपल्या समर्पित योगदानाबाबत पक्षाध्यक्ष म्हणून आदर आणि अभिमान वाटतो,' या शब्दात बावनकुळे यांनी रणजिंत सिंह मोहिते पाटलांची प्रशंसा केली आहे. बावनकुळे यांचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Advertisement

( नक्की वाचा :  Ajit Pawar : दमानियांच्या पुराव्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार? अजित पवारांनी दिलं उत्तर )

मोहिते पाटलांना ई-मेलवरुन भाजपाचे हे पत्र मिळाले आहे. पक्षानं नोटीस बजावल्यानंतरही रणजित सिंह मोहिते पाटलांचं कौतुक करणारं पत्र पक्षानं त्यांना पाठवलं आहे. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या विरुद्धचे पक्षविरोधी कारवाईचे प्रकरण संपुष्टात आलं आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

Advertisement