Budget 2024: किती वाजता सादर होणार अर्थसंकल्प? अर्थमंत्र्यांचे दिवसभराचे नियोजन पाहा एका क्लिकवर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थ संकल्प सादर करणार आहेत. या अर्थ संकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
  1. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या 3.0 चा हा पहिला अर्थसंकल्प असेल. त्या सकाळी 8.40 मिनीटांनी आपल्या घरून निघतील. त्यानंतर त्या थेट अर्थ मंत्रालयात जातील. 
     
  2. निर्मला सीतारमण सकाळी नऊ वाजता अर्थ मंत्रालयात अर्थ संकल्प बनवणाऱ्या टीम बरोबर फोटो सेशन करतील. 
     
  3. त्यानंतर सीतारमण सकाळी 9.10 वाजता आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रपती भवनात जातील. त्यानंतर त्या अर्थ संकल्प सादर करण्याची परवानगी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडून घेतील. 
     
  4. राष्ट्रपती भवनातून अर्थमंत्री सीतारमण 9.45 मिनीटांनी थेट संसदेत रवाना होतील. 
     
  5. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 10 वाजता अर्थ राज्यमंत्र्यांबरोबर संसदेत प्रवेश करतील. इथे पुन्हा एकदा फोटो सेशन केले जाईल. 
     
  6. सकाळी 10.15 मिनिटांनी संसदेत कॅबिनेटची बैठक होईल. त्यानंतर अर्थसंकल्प कॅबिनेट समोर ठेवला जाईल. 
     
  7. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थ संकल्प सादर करतील. 
     
  8. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एक वाजता अर्थ संकल्पावर आपली प्रतिक्रिया देतील. 
     
  9. दुपारी तीन वाजता अर्थ मंत्री निर्मला सीतारमण आपल्या सरकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतील. 
     
  10. लोकसभा आणि राज्यसभेत अर्थ संकल्पावर 20 तासांची चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.