'आमदारच विकत घ्या, फक्त दहा रूपयात' या बॅनरची चर्चा का?

अमळनेर विधानसभेत काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी हे बॅनर संपुर्ण मतदार संघात लावले आहेत. या बॅनरवरील मजकूराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
जळगाव:

लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. आता इच्छुकांनी  विधानसभेची तयारी सुरू केली आहे. जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी इच्छुक नवनव्या शक्कल लढवत आहेत. त्यातच जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर विधानसभेत लागलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अमळनेर विधानसभेत काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी हे बॅनर संपुर्ण मतदार संघात लावले आहेत. या बॅनरवरील मजकूराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संदीप घोरपडे हे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. त्यांनी अनळनेर नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. अमळनेर विधानसभेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील हे आमदार आहेत. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. शिवाय त्यांची मंत्रिमंडळातही वर्णी लागली आहे. त्यामुळे या बॅनरच्या माध्यमातून घोरपडे यांनी पाटील यांना डिवचले आहे.   

ट्रेंडिंग बातमी - पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू 42 जण जखमी

घोरपडे यांनी लावलेल्या बॅनवरवर  'अमळनेर पुन्हा पुन्हा विकले जाणार नाही, यावेळी आमदारच विकत घ्या' फक्त दहा रुपयात असा आशय लिहीला आहे. शिवाय त्यावर घोरपडे यांनी आपली माहिती ही दिली आहे. शिवाय त्यावर एक क्युआरकोडही आहे. या बॅनरच्या माध्यमातून घोरपडे यांनी अनिल पाटील यांना लक्ष केले आहे. आमदार एक प्रकारे विकला गेला असा थेट आरोप त्यांनी केला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'कुठे आहे स्फोटक परिस्थिती?' तायवाडेंनी कोणाला केला सवाल?

महाविकास आघाडीत अमळनेर विधानसभा मतदार संघ तसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी काँग्रेसच्या संदीप घोरपडे यांनी मतदार संघावर या माध्यमातून एकप्रकारे दावा केला आहे. त्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेससाठी सोडणार की स्वत:चा उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाईल. विद्यमान आमदार आणि मंत्री अनिल पाटील हेच उमेदवार असतील हे निश्चित आहे. मात्र या मतदार संघातून भाजपचे शिरीष चौधरी ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.   

Advertisement