Parvesh Verma : प्रवेश वर्मांनी लग्नापूर्वी पत्नीसमोर ठेवली होती अजब अट, पूर्ण न झाल्याची आजही खंत

Parvesh Verma News : दिल्लीतील भाजपाच्या जोरदार विजयानंतर मुख्यंंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांना या निवडणुकीतील 'मॅन ऑफ द मॅच' असंही म्हंटलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार प्रवेश वर्मा (Parvesh Verma) यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभूत केलं आहे. भाजपाच्या जोरदार विजयानंतर मुख्यंंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांना या निवडणुकीतील 'मॅन ऑफ द मॅच' असंही म्हंटलं जात आहे. आम्ही प्रवेश वर्मा यांचे कुटुंब, पत्नी आणि मुलांबाबत एक असा किस्सा सांगणार आहोत, ते समजल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाहीय

प्रवेश वर्मा यांनी 2024 मध्ये एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्य़ा मुलाखतीमध्ये स्वत: हा किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितलं की, लग्नापूर्वी त्यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नी स्वाती यांच्यासमोर एक अट ठेवली होती. त्यांना लग्न करायचं असेल तर एक किंवा दोन नाही तर पाच मुलांना जन्म देण्यासाठी तयार राहावं लागेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दोन मुली आणि एक मुलगा

लग्नापूर्वी भावी पतीकडून या प्रकारची अट ऐकून स्वाती यांना सुरुवातीला धक्का बसला होता. पण, नंतर बराच विचार केल्यानंतर त्यांनी प्रवेश वर्मा यांची अट मान्य केली. अर्थात लग्नानंतर वर्मा दाम्पत्यांना तीन मुलांवरच थांबावे लागले. त्यांना सनिधी आणि त्रिशा या दोन मुली आणि शिवेन हा एक मुलगा आहे.  

का बदलला निर्णय?

वर्मा यांना नेहमी पाच मुलांचं कुटुंब हवं होतं. पण, वर्मा दाम्पत्यांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. तीन मुलांच्या जन्मानंतर स्वाती यांना सिजेरियन ऑपरेशन करावं लागलं. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांपुढं आणखी दोन मुलांना जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, डॉक्टरांनी त्यांना मनाई केली. तीन सिजिरियन डिलिव्हरीनंतर चौथ्या मुलाला जन्म देणं स्वाती वर्मा यांच्या तब्येतीसाठी धोकादायक असू शकतं, असा इशारा डॉक्टरांनी दिला होता.

Advertisement

( नक्की वाचा :  Delhi Election Results 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा )

आजही वाईट वाटतं...

प्रवेश वर्मांनी त्यानंतर तीन मुलांवर थांबण्याचा निर्णय घेतला. पण, पाच मुलांचा बाप न झाल्याची त्यांना आजही खंत आहे. त्यांनी मीडियाशी बोलतानाच याबाबतचा खुलासा केला होता. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्या डॉक्टरांची भेट झाली होती, त्यावेळी मॅडम तुम्ही माझं खूप नुकसान केलं. मला फक्त तीन नाही तर पाच मुलं पाहिजे होती,' असं आपण त्या डॉक्टरांना सांगितल्याची माहिती वर्मा यांनी दिली होती. 

स्वाती यांच्या कुटुंबाचे राजकीय कनेक्शन

प्रवेश वर्मा यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांचे वडील साहेबसिंह वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होते. स्वाती वर्मा या देखील राजकीय कुटुंबातील आहेत. मध्य प्रदेशातील दिग्गज भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विक्रम वर्मा हे त्यांचे वडील आहेत. स्वाती सिंह वर्मा यांच्या आई नीना वर्मा देखील आमदार आहेत. 

स्वाती वर्मा यांनी एमबीएपर्यंतच शिक्षण घेतलंय. त्यांचा सामाजिक कामांमध्ये मोठा सहभाग असतो. त्याचबरोबर त्या स्वत:चा व्यवसाय देखील सांभाळतात. एका अंदाजानुसार त्यांचे नेटवर्थ जवळपास 17 कोटी आहे.