संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो सर्वांसमोर आल्यानंतर समाजात त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.शिवाय त्यांना सह आरोपी करण्याची मागणी ही करण्यात आली. वाढता दबाव पाहाता अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मोठं वक्त्य केलं आहे. मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणारा आपण पहिला व्यक्ती होतो असं त्यांनी सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मी तर पहिली व्यक्ती होतो, ज्यांने सांगितले की धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा, असं शंभाजी राजे म्हणाले. आता राजीनामा झालं म्हणजे संपलं असं होणार नाही. या प्रकरणाची आता सखोल चौकशी केली पाहीजे, असं ही ते म्हणाले. दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहीजे असं ही त्यांनी सांगितले. आत पुढची कारवाई काय आहे हे सरकारने स्पष्ट केले पाहीजे असंही त्यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
मुंडेंनी राजीनामा देताना आपण तब्बेतीच्या कारणाने राजीनामा देत आहे असं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी दोन ते तीन महिने घेतले असंही राजे म्हणाले. हा मग्रुरीपणा आहे असं ही त्यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे. मुंडे जे काही बोलून गेले आहेत ती काय मानसिकता आहे हे समजतेय .असे लोक महाराष्ट्रात कसे राहू शकतात, अशी विचारणा ही त्यांनी या निमित्ताने केली.
(नक्की वाचा- Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडेंना दणका; CM फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश?)
दरम्यान राजेंनी यावेळी अबू आझमी यांच्यावर ही टीका केली. त्यांनी औरंगजेबाबाबत जे वक्तव्य केलं आहेते पाहाता अबू आझमी सारखा माणूस महाराष्ट्रात राहू कसा शकतो. अश्या लोकांना महाराष्ट्रातून हाकलून लावा असं ही ते म्हणाले. मी कोणाला भेटायला आलो नाही. मी कोणालाही निवेदन देणार नाही. मी कशाला हे करायला पाहीजे. ते सरकारने करावे असंही ते म्हणाले.