Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्या मागे सत्य काय आहे हेच त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर ही त्यांच्यावर टीकेची झोड सुरूच आहे. आता त्यांच्या आईबाबतही आमदार सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केला होता. धनंजय मुंडे हे वाल्मीक कराड यांच्या प्रचंड आहारी गेले होते. वाल्मीक कुणाचं काही एक चालू देत नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडें यांच्या कुटुंबातले लोकही नाराज झाले होते. शिवाय त्यांची आई ही नाथरा या मुळा गावी शेतात राहण्यासाठी गेली होती असं धस यांनी सांगितलं होतं. त्याला आता धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्या मागे सत्य काय आहे हेच त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धनंजय मुंडे यांच्या आई ही त्यांच्यावर नाराज होत्या असं सांगण्याचा प्रयत्न सुरेश धस यांनी केला. त्यातून त्या गेल्या दिड वर्षापासून त्यांच्या मुळ गावी म्हणजे नाथ्रा इथं राहायला गेल्या होत्या. त्या गावातील शेतात असलेल्या घरात राहात होत्या, असं धस यांनी सांगितलं. याला आता धनंजय मुंडे यांच्यावतीने उत्तर देण्यात आले आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे थेट उत्तर दिले आहे. शिवाय आई शेतात रहायला का गेली त्या मागचं कारण ही दिलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Raj Thackeray Speech : "अंधश्रद्धेतून बाहेर या", राज ठाकरेंनी 'महाकुंभ'च्या पवित्र स्नानाची उडवली खिल्ली

ते लिहीतात,  परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत. तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच या आधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते. काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले, आणि खोटेनाटे आरोप केले. असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb tomb News: औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं, महायुतीतच वाद पेटला?

पुढे ते म्हणतात, माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात. हेही सर्वांना माहित आहे. मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केले गेले. मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे. असं ही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Case: 'आज वाढदिवस..', भावाच्या फोटोसमोर धनंजय देशमुख ढसाढसा रडले, बारामतीकरही सुन्न

राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या आहेत. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली. शंका निर्माण केल्या गेल्या. तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिंम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे. राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत आहे. असं शेवटी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.