Eknath Khadse: 'गिरीश महाजन यांनी माझ्या सख्ख्या भाच्याला...', एकनाथ खडसेंच्या आणखी एका आरोपाने खळबळ

याच पार्श्वभूमीवर खडसे यांनी कारागृह साहित्य पुरवठा घोटाळ्यावरही टीका केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. खडसे यांनी म्हटले की, “गिरीश महाजन यांनी आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले. ज्यामुळे त्याला विनाकारण सात वर्षे कारागृहात राहावे लागले. तो निर्दोष सुटल्यावर त्याने मला कारागृहातील अत्यंत निकृष्ट जेवण व परिस्थितीची माहिती दिली. खडसे यांनी केलेल्या या नवा आरोपनंतर महाजन त्यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याच पार्श्वभूमीवर खडसे यांनी कारागृह साहित्य पुरवठा घोटाळ्यावरही टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही घोटाळ्याचा आरोप करत, यामध्ये एका जळगावमधील मंत्र्याच्या सहकार्याचा उल्लेख केला होता. याबाबत आपण माहिती घेत आहोत. लवकरच विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे गिरीश महाजन आणि संबंधित मंत्र्यावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता असून, कारागृह व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 Final: जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोण ठरणार चॅम्पियन? नियम काय सांगतात?

दरम्यान याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी काही झाला तरी खडसेंना मीच दिसतो, म्हणून ते माझं नाव घेऊन पुढे जातात अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र मी आरोप करताना कोणाचं नाव घेतलं नसून "लेकी बोले सुने लागे" असे म्हणत एकनाथ खडसेंनी ज्यांनी हे केलं असेल त्यांना लागेल, असा टोला एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना लगावला आहे. त्यामुळे या दोघांमधील वाकयुद्ध थांबताना दिसत नाही. मात्र या मुद्द्यावर गिरीश महाजन यांना घेरण्यासाठी खडसे आता पुन्हा एकदा सरसावले आहेत.