Khadse vs Mahajan: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या जळगाव जिल्ह्यातील पारंपारिक प्रतिस्पर्धींमधील वाद पुन्हा एकदा उफळला आहे. एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे यांनी 2013 साली आत्महत्या केली होती. ही ही आत्महत्या होती की हत्या, असा सवाल गिरीश महाजनांनी केला होता. त्याला खडसे यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर महिलांबाबत नेहमी गिरीश महाजनांचंच नाव का समोर येतं? असा सवालही त्यांनी विचारला.
काय म्हणाले खडसे?
गिरीश महाजन हे अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी काय विकास केला असा सवाल खडसे यांनी केला. त्यांनी या जिल्ह्यात कोणता मोठा प्रकल्प आणला हे सांगावं? असं आव्हान खडसे यांनी विचारला. मी महाराष्ट्राचा विकास समोर ठेवला. चाळीसगावचा किंवा जामनेरचा विकास डोळ्यासमोर ठेवला नाही.
गिरीश महाजनांनी माझं आव्हान स्वीकारावं. त्यांनी स्वत:च्या संपत्तीची चौकशी करण्याचं आव्हान स्वीकारावं. प्रफुल लोढाची नार्को टेस्ट करण्याचं आव्हान स्वीकारावं. मुलाच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशी करण्याचं आव्हान गिरीशभाऊंनी स्वीकारावं असं आव्हान खडसे यांनी दिलं.
( नक्की वाचा : BJP vs Shiv Sena: शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजप मंत्र्यांवर थेट आक्षेप, पत्र लिहून दिला खरमरीत आदेश )
'गिरीश महाजनाचंच नाव का पुढं येतं?'
'गिरीश महाजन यांचे नाव मी घेतले नाही. प्रफुल लोढा यांनी पहिल्यांदा महाजनांचे नाव घेतले होते. मी बटन दाबलं तर देशात तहलका माजेल हे त्यांचे शब्द आहेत, माझे नाहीत असं खडसे म्हणाले. 'गिरीश महाजनांचा एका महिला IAS अधिकाऱ्यांशी संबंध आहे' असा आरोप मी केला नाही. हा आरोप अनिल थत्ते नावाच्या पत्रकारानं केला होता. त्यांनाही गिरीश महाजनांचेच नाव IAS महिला अधिकाऱ्याशी का जोडावं वाटलं?
महाराष्ट्राच्या विधानसभेत अजित पवारांचा 'अंकल' असा उल्लेख केला होता. तसंच किती काकी आहेत, असाही प्रश्न विचारला होता, असा दावा खडसे यांनी केला.
माझ्या संपत्तीची पाचवेळा चौकशी झाली. गिरीश महाजन यांच्या संपत्तीचीही चौकशी व्हावी असं आव्हान खडसे यांनी केलं. गिरीश महाजन यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, हे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून सन्यास घेईन असंही खडसे यावेळी म्हणाले.