विशाल पाटील, प्रतिनिधी
Election Commission Of India : देशात सध्या मतदार यादीच्या सखोल पुनर्निरीक्षणाबाबत मोठी चर्चा सुरू असून, तब्बल 10 कोटी मतदार वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर महाराष्ट्रात जवळपास 1 कोटी मतदारांच्या नावांवर परिणाम होऊ शकतो,अशी चर्चा केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने तातडीने पावले उचलत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीत मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision -SIR) हा मुख्य अजेंडा ठेवण्यात आला.
मतदार वगळले जाऊ नयेत, शिंदे गटाच्या पक्षाची स्पष्ट सूचना
बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की, “शिवसेनेचा एकही मतदार यादीतून वगळला जाऊ नये.” त्यासाठी 15 मेपर्यंत चालणाऱ्या मोहिमेकडे पूर्ण लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षाने कार्यकर्त्यांना सांगितले आहे की,इतर कामे बाजूला ठेवून या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.
बीएलओकडून घराघरात पडताळणी
- या मोहिमेअंतर्गत बीएलओ (Booth Level Officer) मार्फत घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी केली जाणार आहे.
- प्रत्येक मतदाराची वैयक्तिक माहिती तपासली जाणार
- चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास सुधारणा केली जाणार
- प्रत्यक्ष भेटीद्वारे नावाची खात्री केली जाणार
तसेच,विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागासाठी पक्षाकडून BLA (Booth Level Agent) नेमले जाणार असून, त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नक्की वाचा >> Iran War : होर्मुजमध्ये भारतीय जहाजांची स्थिती काय? सरकारने दिली मोठी अपडेट, "नवी मुंबईच्या JNPT बंदरात.."
राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता
बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला.
सध्या पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे नमूद करण्यात आले
भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याची नोंद
जर दुर्लक्ष झाले,तर दुसरा क्रमांकही गमावण्याचा इशारा
बीएलओच्या कामावर लक्ष ठेवा, तक्रार करा
कार्यकर्त्यांना असेही सांगण्यात आले की,जर बीएसओकडून चुकीची कार्यपद्धती दिसली, तर तात्काळ तक्रार करावी.कारण,“मतदार हेच यशाची गुरुकिल्ली आहेत. तेच वगळले गेले,तर परिणाम गंभीर होऊ शकतो,” असे पक्षाने स्पष्ट केले.
नक्की वाचा >> '9 वी पर्यंत शिकवलं, 10 वीत शिकवू शकत नाही', मुख्याध्यापिका पालकांवर भडकल्या, ठाण्यातील शाळेचा व्हिडीओ व्हायरल
इतर राज्यांतील परिस्थिती (SIR मोहिमेअंतर्गत)
देशातील विविध राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याची आकडेवारी समोर आली आहे:
- बिहार – 65 लाख
- उत्तर प्रदेश – 2.89 कोटी
- तामिळनाडू – 97 लाख
- गुजरात – 73 लाख
- पश्चिम बंगाल – 63 लाख
- राजस्थान – 44 लाख
- केरळ – 24 लाख
- छत्तीसगड – 27 लाख
- गोवा – सुमारे 10 लाख