अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नरहरी झिरवळ हे किडनीच्या आजाराने त्रस्त झाल्यामुळे मागील 8 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात झिरवाळ यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
बातमी अपडेट होत आहे.