Haryana Election Results 2024: किती चालले जवान, किसान आणि पहेलवान फॅक्टर? निकाल काय सांगतात?

Haryana Election Results 2024 : जवान, पहलवान आणि किसान या तीन गोष्टींसाठी हरियाणा ओळखले जाते. निवडणूक निकालानुसार या वर्गाचा कल कुणाकडं आहे हे स्पष्ट झालं आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Haryana Election Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व एग्झिट पोलचे अंदाज चुकवत भाजपानं बहुमत मिळवलं आहे. तर काँग्रेसला अपेक्षानुसार कामगिरी करता आलेली नाही. हरियाणात पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा एकाच पक्षाला सरकार बनवण्याची संधी मिळाली आहे. जवान, पहलवान आणि किसान या तीन गोष्टींसाठी हरियाणा ओळखले जाते. निवडणूक निकालानुसार या वर्गाचा कल कुणाकडं आहे हे स्पष्ट झालं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नरेटीव्ह फेल

या निवडणुकीच्या प्रचारात हरियाणाचे मतदार भाजपा सरकारवर नाराज आहेत, हा नरेटीव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तरुण, शेतकरी आणि कुस्तीगीर भाजपावर प्रचंड नाराज आहेत. त्यांची नाराजी मतपेटीमध्ये दिसणार, असा विश्लेषकांचा अंदाज होता. भाजपानं या सर्व विश्लेषकांना खोटं ठरवत हरियाणामधील आजवरच्या सर्वात मोठ्या विजयाच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. 

भाजपावर तरुण नाराज होते?

निवडणूक प्रचाराच्या दरम्यान हरियाणातील बेरोजगारीचा मुद्दा विरोधी पक्षांनी उपस्थित केला होता. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार हरियाणात बेरोजगारीचा दर 9 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय दरापेक्षा हे प्रमाण 4.1 टक्के जास्त आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्दा निवडणूक प्रचारात मांडला होता.

हरियाणातील मनोहरलाल खट्टर यांनी एलिजिबिलिटी टेस्ट (सीईटी) दरवर्षी घेण्यात येईल आणि त्या परीक्षेच्या आधारावर नोकरी देणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण, ही परीक्षा आत्तापर्यंत फक्त एकदा झाली. त्यानंतरही निवडणूक निकालानंतर तरुणांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवल्याचं स्पष्ट झालं आहे. 

( नक्की वाचा : Haryana Elections Results : हरियणातील भाजपाच्या विजयानंतर राहुल गांधी आणि जिलबीची का होतीय चर्चा? )
 

शेतकऱ्यांची नाराजी पडली भारी?

नरेंद्र मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी दिल्लीकडं धाव घेतली त्यावेळी हरियाणा पोलिसांनी त्यांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण केले. हरियाणातील भाजपा सरकारचा प्रतिकार मोडून शेतकरी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकऱ्यांचा विरोध कायम होता.

पंजाबमधील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा एकदा दिल्लीकडं धाव घेतली. त्यावेळी तत्कालीन मनोहरलाल खट्टर सरकारनं त्यांना हरियाणाच्या सीमेत घुसू दिलं नाही. त्यामुळे भाजपाची शेतकरी विरोधी प्रतिमा निर्माण झाली. विरोधकांनी या मुद्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा सामना करण्यासाठी भाजपानं 24 पिकांना किमान आधार मुल्य (एमएसपी) देण्याची घोषणा जाहिरनाम्यात केली. शेतकऱ्यांचं या आश्वासनानं समाधान झाल्याचं निवडणूक निकालामध्ये स्पष्ट होत आहे. त्यांनी भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं. 

( नक्की वाचा : Haryana Elections Results 2024 हरियाणातील काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची 5 प्रमुख कारणं कोणती? )
 

कुस्तीपटूंच्या प्रदर्शनाचा निवडणुकांवर परिणाम?

हरियाणामधील काही महिला कुस्तीपटूंनी भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कथित लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. बृज भूषण शरण सिंह त्यावेळी भारतीय कुस्ती संघटनेचे प्रमुख होते. कुस्तीपटूंनी या विषयावर दिल्लीत आंदोलन केलं. दिल्ली पोलिसांवर हे आंदोलन दडपण्याचा आरोप झाला. हे प्रकरण कोर्टात गेलं. आजही त्यावर न्यायालयीन लढाई कायदेशीर लढाई सुरु आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा फटका हरियाणातील विधानसभा निवडणुकीत बसेल, असा अंदाज होता पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपा सरकार बनवणार आहे.