झारखंडमध्ये सत्ताबदलानंतर नाराजीनाट्य! खूर्ची गेल्यानंतर चंपई सोरेन काय करणार?

झारखंडमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेता (Jharkhand Mukti Morcha)  हेमंत सोरेन (Hemant Soren) पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
H
मुंबई:

झारखंडमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेता (Jharkhand Mukti Morcha)  हेमंत सोरेन (Hemant Soren) पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. बुधवारी राजधानी रांचीमध्ये जेएमएम, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांच्या बैठकीत एकमतानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पक्षाच्या निर्णयानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर, हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार चंपई सोरेन मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानं नाराज आहे. अर्थात याबाबत त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे नाराजीचं कारण?

चंपई सोरने हे जेएमएमच्या कोल्हान भागातील मोठे नेते आहेत. ते 1991 पासून आमदार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चामधील अनेक फुटीनंतरही त्यांनी शिबू सोरेन यांची साथ सोडली नाही. त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये फेब्रुवारी महिन्यात राज्याचं नेतृत्त्व स्विकारलं. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष फुटणार अशी चर्चा होती. त्यानंतरही चंपई यांनी अत्यंत समंजसपणे हेमंत सोरेन यांच्या अनुपस्थिमध्ये पक्ष सांभाळला.

लोकसभा निवडणुकीतही जेएमएमनं मागच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. 2019 साली जेएमएमला फक्त 1 जागा मिळवली होती. त्यांना यंदा 3 जागांवर विजय मिळवला. मोठ्या कालावधीनंतर पक्षानं कोल्हान परिसरात एक जागा जिंकली.

( नक्की वाचा : बालबुद्धी, शोले की मौसी... PM मोदींनी राहुल गांधींवर केलेल्या थेट हल्ल्यातील 5 प्रमुख मुद्दे )
 

चंपई सोरेन काय करणार?

चंपई सोरेन बऱ्याच काळापासून पक्षात नंबर 2 ची भूमिका बजावत आहेत. सोरेन कुटंबानंतर तेच पक्षातील बडे नेते आहेत. हेमंत सोरेन मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विभाग सांभाळले आहेत. 5 महिने मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर पुन्हा एकदा हेमंत सरकारमध्ये ते मंत्री होतील ही शक्यता कमी आहे. त्यांना पक्षाचं कार्यकारी अध्यक्ष केलं जाईल, अशी चर्चा आहे.

Advertisement

जेएमएम पक्षाची वाटचाल जवळून पाहणाऱ्या व्यक्तींनुसार सोरेन कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला अध्यक्ष केलं तर पक्षातील सत्तेचं हस्तांतरण सहज होणार नाही. कार्यकारी अध्यक्ष पद मिळालं तर सोरेन फारसे समाधानी नसतील. 

झारखंडमध्ये जेएममचा आधार मुख्यत: संथाल आणि कोल्हान या दोन भागात केंद्रीत आहे. संथाल हे शिबू सोरेन यांचे कार्यक्षेचत्र होते. तर कोल्हान भागात पक्षाचे नेते सतत बदलले आहेत. या भागातील नेत्यांनी यापूर्वी बंडही केलं होतं. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमनं याच भागात चांगली कामगिरी केली होती. चंपई सोरेन या भागात टायगर या नावानं ओळखले जातात. त्यामुळे ते नाराज असतील तर त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला बसू शकतो. 

Advertisement

( नक्की वाचा : तामिळनाडू भाजपा अध्यक्ष अन्नामलाईंनी शिक्षणासाठी घेतली रजा, ब्रिटनमध्ये गिरवणार 'नेतागिरी'चे धडे )
 

हेमंत सोरेन का होणार मुख्यमंत्री?

हेमंत सोरेन झारखंडमधील काँग्रेस-जेएमएम आघाडीचे सर्वमान्य नेते आहेत. जेलमधून परतल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कायम आहे. चंपई सोरेन यांना कोल्हनच्या बाहेर जनाधार नाही. त्याचवेळी भाजपानं बाबूलाल मरांडीसारख्या भक्कम नेत्याच्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांचा सामना करण्यासाठी मजबूत नेत्याची काँग्रेस-जेएमएम आघाडीला गरज होती. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार जेएमएम पक्षाची व्होटबँकही सोरेन कुटुंबीयांकडंच आहे. 

झारखंड विधानसभेचं समीकरण काय?

झारखंड विधानसभेतील आमदारांची संख्या 81 आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सत्तारुढ जेएमएम-काँग्रेस-राजद आघाडीच्या आमदारांची संख्या 45 झाली आहे. या आघाडीचे दोन आमदार लोकसभेवर निवडून गेल्यानं त्यांनी आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे 24 आमदार आहेत. 

Advertisement
Topics mentioned in this article