राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना कृषी मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांना राज्यभरातून शेतकऱ्यांची फोन येत आहेत. त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहे. काही प्रश्न तर त्यांच्या विभागा शिवाय विचारले जात आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे चांगलेच वैतागले आहेत. त्यांनी आपला राग जाहीर कार्यक्रमातच व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपण कामाला लागलो. आपले दौरे सुरू झाले आहेत. बैठका घेतल्या जात आहे. अनेक प्रदर्शनांना भेट देत आहेत. कृषी मंत्री म्हटल्यावर आपल्याला अनेक फोन येत आहेत. विदर्भातून अनेक फोन येत आहेत. सोयाबिनला भाव किती मिळणार. त्याची खरेदी कधी सुरू होणार असे प्रश्न विचारले जात आहेत. हे प्रश्न पणन खात्याच्या संदर्भात येतात. तरीही त्या बाबतची विचारणा आपल्याला केली जाते. शिवाय काही वेळा ऐकून ही घ्यालं लागत आहे असंही ते म्हणाले.
जे फोन येतात त्यांना सांगत असतो सोयाबीन खरेदीचा प्रश्न पणन खात्याशी संबंधित आहे. तरी शेतकऱ्यांचे फोन मलाचं येतात. शेवटी मी पणन मंत्र्यांना म्हटलं, अरे बाबा हे काय चाललंय? असं म्हणताना सोयाबीन खरेदीवरुन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची चिडचिड झाल्याचं दिसून आलं. सोयाबीनचे भाव हे केंद्र सरकार ठरवते. राज्य सरकार हे भाव ठरवत नाही. असं म्हणत कोकाटे यांनी सोयाबीन दराबाबत हात वर केले.
कृषी मंत्री म्हणून सर्वच जण आपल्याला विचारणा करतात. पण मंत्री झाल्यापासून आपल्याला बसायला कार्यालय नाही. कोणत्या विभागात कोण अधिकारी आहेत हे माहित नाही, तरीही आपणच सर्व गोष्टींना जबाबदार असल्या सारखं होत आहे असं ही कोकाटे यावेळी म्हणाले. त्यामुळे सध्या कोकाटे हे त्रस्त आहेत. त्यांना त्यामुळेच आपण कृषी खात्याचे मंत्री आहोत आपली कामं काय आणि पणन विभागाची कामं काय हे सांगावं लागलं आहे.