TCS प्रकरणाला वेगळेच वळण? खरात प्रकरणाचे काय आहे कनेक्शन? जलील यांच्या दाव्याने ट्वीस्ट

निदाच्या जागी कोणी निशा पाटील असती तरी मी तितक्याच ताकदीने उभा राहिलो असतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • टीसीएसमधील कथित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप
  • जलील यांच्या म्हणण्यानुसार भाजपने अशोक खरातला वाचवण्यासाठी हे प्रकरण रचले आहे
  • खरात प्रकरणावरील लक्ष विचलित करण्यासाठी विशिष्ट अजेंडा राबवला असल्याचा जलील यांनी दावा आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
छत्रपती संभाजीनगर:

टीसीएसमधील कथीत धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने या प्रकरणाला वळण मिळाले आहे. हे प्रकरण केवळ विशिष्ट समुदायातील तरुणांना लक्ष्य करण्यासाठी रचलेले षडयंत्र होते, असा गंभीर आरोप जलील यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य दुवा असलेल्या अशोक खरात यांना वाचवण्यासाठीच भाजपने हे सर्व नाट्य घडवून आणल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इम्तियाज जलील यांच्या दाव्यानुसार, अशोक खरात हे भाजपच्या बड्या नेत्यांचे नातेवाईक आहेत. त्यांना या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी जाणीवपूर्वक नवीन मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. दिल्लीहून आलेल्या एका विशिष्ट मीडिया समूहाने ठराविक अजेंडा राबवून खरात प्रकरणावरील  लक्ष विचलित केले. जेणेकरून जनता खरात याला विसरून जाईल, असा दावा जलील यांनी केला आहे. खरात प्रकरण दाबून ठेवण्यासाठीच हे टीसीएस प्रकरणाचा बनाव केल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pratap Sarnaik: मराठी सक्तीबाबत काय निर्णय झाला? रिक्षा- टॅक्सी चालकांचं टेन्शन वाढलं की कमी झालं?

या प्रकरणात निदा खान नावाच्या तरुणीचा वापर करण्यात आल्याचे जलील यांनी सुचित केले. "जेव्हा या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता, तेव्हाच मी निदाच्या कुटुंबाची भेट घेतली होती. असे जलील म्हणाले. ही सर्व कथा खोटी असून पोलिसांवर भाजपच्या काही संघटनांचा दबाव होता," असेही ते म्हणाले. निदा खान केवळ मुस्लिम आहे म्हणून नव्हे, तर तिच्या जागी कोणीही दुसरी मुलगी असती तरी मी अन्यायाविरोधात उभा राहिलो असतो, अशी स्पष्ट भूमिका जलील यांनी मांडली आहे.

नक्की वाचा - Success Story: ना कश्मीर ना हिमाचल! महाराष्ट्रातल्या 'या' गावात सफरचंदाची शेती, शेतकरी मालामाल

जलील यांच्या या दाव्यामुळे टीसीएस प्रकरणातील गुंता आता अधिकच वाढला आहे. "हे प्रकरण म्हणजे ठराविक तरुणांना टार्गेट करण्यासाठी आखलेला एक मोठा प्लॅन होता," असा खळबळजनक दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे राजकारण असून अशोक खरात नावाच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी भाजपच्या यंत्रणेने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला. "अन्यायाविरुद्ध लढताना मी जात-पात पाहत नाही, निदाच्या जागी कोणी निशा पाटील असती तरी मी तितक्याच ताकदीने उभा राहिलो असतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Topics mentioned in this article