Tamil Nadu : भाषेच्या वादात अभिनेता Vijay ची एन्ट्री, अण्णामलाईंनी सांगितला सुपरस्टारचा इतिहास!

तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेच्या वापरावरील वाद वाढत चालला आहे. या वादात आता अभिनेता ते राजकीय नेता असा प्रवास केलेल्या विजयची (Superstar Vijay) एन्ट्री झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन सरकार आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यात हिंदी भाषेच्या वापरावरील वाद वाढत चालला आहे. या वादात आता अभिनेता ते राजकीय नेता असा प्रवास केलेल्या विजयची (Superstar Vijay) एन्ट्री झाली आहे. तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाचा प्रमुख असलेल्या विजयनं चेन्नईतील एका कार्यक्रमात बोलताना या दोन पक्षांवर टीका केली. भाजपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई  (K Annamalai ) यांनी विजय यांच्या टिकेला उत्तर देत अभिनेत्याचा इतिहास सांगितला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'KG च्या मुलांसारखे भांडतात'

विजयनं भाजपा आणि डीएमके पक्षातील वाद हा बालवाडीतील (किंडरगार्टन) मुलांच्या भांडणासारखा आहे, अशी टीका केली आहे. भाजपा आणि डीएमके हे दोन्ही एकाच सुरात आहेत. एक (पक्ष) गातो तर दुसरा नाचतो. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष केलं जात आहे. केंद्र सरकारनं राज्याना आर्थिक मदत करण्यास नकार देणं हे बालावडीतल्या मुलांच्या भांडणासारखं आहे. राज्याला निधी देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असं विजय यांनी सांगितलं.

तामिळनाडूच्या सांस्कृतीक आणि भाषेच्या इतिहासावर विजय यांनी सांगितला. त्यांनी तामिळ मतदारांसाठी #GateOut हा हॅशटॅग सुरु केला आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातून डीएमके आणि भाजपाला हटवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

( नक्की वाचा :  नेमकं काय चाललंय? शशी थरुर यांच्या पीयुष गोयलांसोबतच्या सेल्फीनं चर्चेला उधाण )
 

अण्णामलाईंनी सांगितला इतिहास

भाजपाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी विजय यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. अण्णामलाई यांनी विजय यांना भाऊ (Bro) असं संबोधून त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. अभिनेत्याचे मुलं आणि त्याची स्वत:ची 'विजय विद्याश्रम' (Vijay Vidyashram) ही शाळा तीन भाषेचं सूत्र चालवत आहे. पण, ते टीएमके पक्षातून दोन भाषेंच्या वापरावर जोर देत आहेत. 

Advertisement

'मला तुम्हाला (Vijay) सांगायचं आहे की तुम्ही जसं जगता तसंच वागा. तुम्ही खोटं का बोलत आहात? तुमची मुलं तीन भाषा शिकतात. तुम्ही चालवत असलेल्या 'विजय विद्याश्रम' शाळेत तीन भाषा शिकवल्या जातात. पण, TVK पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुलांनी दोन भाषा शिकायच्या?,' असा सवाल त्यांनी विचारला आहे. विजय यांनी सुरु केलेल्या #GateOut  बोर्डावर त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रशांत किशोर यांनी स्वाक्षरी केली नाही, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.