Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) सर्वोच्च न्यायालयासमोर (Supreme Court) ही चूक मान्य केली आहे. आयोगाने सादर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तब्बल 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची कायदेशीर मर्यादा ओलांडली गेली आहे.
सर्वोच्च न्यायालयात काय झालं?
मागील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात माहिती सादर करून 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यात आल्याचे कबूल केले आहे. या गंभीर अनियमिततेमुळे या सर्व 57 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचे भवितव्य सध्या अधांतरी आहे.
या प्रकरणी उद्या (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2025) सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालय काय निर्णय देणार, या निवडणुकांना स्थगिती देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Local Body Elections: 246 नगर परिषदा, 42 नगर पंचायतींसाठी मतदान 2 डिसेंबरला; वाचा A to Z माहिती )
निर्णयाचे दूरगामी परिणाम
शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांना स्थगिती दिली, तर राज्य सरकारची भूमिका काय असेल आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल, हा कळीचा मुद्दा असणार आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे, न्यायालयात याबाबत झालेला कोणताही निर्णय महाराष्ट्रातील राजकीय आणि स्थानिक प्रशासकीय स्तरावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो.
या नगरपरिषदेंचं भवितव्य टांगणीला
धारणी, अमरावती
मालेगाव, वाशिम
ढांकी, यवतमाळ
वाडा, पालघर
भिसी, चंद्रपूर
गोरेगाव, गोंदिया
सालेकसा, गोंदिया
बेसा पिपला, नागपूर
भिवापूर, नागपूर
बिडगाव-तरोडी, नागपूर
गोधणी रेल्वे, नागपूर
कांदरी कन्हान, नागपूर
महादुला, नागपूर
मोवाड, नागपूर
निळदोह, नागपूर
येरखेडा, नागपूर
शिंदखेडा, धुळे
चिखलदरा, अमरावती
दर्यापूर, अमरावती
आर्णी, यवतमाळ
यवतमाळ
बिलोली, नांदेड
धर्माबाद, नांदेड
कुंडलवाडी, नांदेड
उमरी, नांदेड
पूर्णा, परभणी
जव्हार, पालघर
साकोली, भंडारा
बल्लारपूर, चंद्रपूर
भंडारवाटी, चंद्रपूर
ब्रह्मपुरी, चंद्रपूर
चिमूर, चंद्रपूर
गुग्गुस, चंद्रपूर
नागभीड, चंद्रपूर
राजुरा, चंद्रपूर
आरमोरी, गडचिरोली
देसाईगंज, गडचिरोली
गडचिरोली
बुटीबोरी, नागपूर
दिगदोह देवी, नागपूर
कमठी, नागपूर
काटोल, नागपूर
खापा, नागपूर
उमरेड, नागपूर
कन्हान पिंपरी, नागपूर
वाडी, नागपूर
पुलगाव, वर्धा
शिर्डी, अहिल्यानगर
पिंपळनेर, धुळे
नवापूर, नंदुरबार
तळोदा, नंदुरबार
मनमाड, नाशिक
पिंपळगाव बसवंत, नाशिक
इगतपुरी, नाशिक
ओझर, नाशिक
त्र्यंबक, नाशिक
दौंड, पुणे