BMC Exit Poll : मुंबईतील मराठ्यांनी कोणाला दिलं मत? महिला-पुरुषांची टक्केवारी किती? पाहा पक्षनिहाय आकडेवारी

मतदान पार पडल्यानंतर देशातील वेगवेगळ्या एजन्सींनी एग्झिट पोल जाहीर केले आहेत.या एग्झिट पोलकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच एनडीटीव्ही एक्सिस माय इंडिया एग्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेचा निकाल कसा असणार आहे? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती. 

जाहिरात
Read Time: 2 mins
BMC Election 2026 Exit Poll
मुंबई:

BMC Election 2026 Axis MYINDIA Exit Poll : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उद्या 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर आता निवडणुकीचे एग्झिट पोल समोर आले आहेत.राज्यात विविध ठिकाणी मतदान पार पडल्यानंतर देशातील वेगवेगळ्या एजन्सींनी एग्झिट पोल जाहीर केले आहेत.या एग्झिट पोलकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच एनडीटीव्ही एक्सिस माय इंडिया एग्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेचा निकाल कसा असणार आहे? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती. 

Axis MYINDIA Exit Poll:  महिला-पुरुषांनी कोणाला दिली किती मतं?

एक्सिस माय इंडियाच्या एग्झिट पोलनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप प्लसला पुरषांची 40 टक्के, तर महिलांची 44 टक्के मतं मिळाली आहेत.शिवसेना (UBT) प्लससाठी पुरुषांची 33 टक्के, तर महिलांची 31 टक्के मतं मिळाली आहेत.तसच काँग्रेस प्लसला पुरुष आणि महिलांची समान म्हणजेच 13 टक्के मतं मिळाली आहेत. तर इतरमध्ये पुरुषांची 14 टक्के, तर महिलांच्या 12 टक्के मतांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Axis MYINDIA Exit Poll: कोणी दिलं कोणत्या पक्षाला मतं? पाहा संपूर्ण यादी 

Axis MYINDIA Exit Poll:  काँग्रेसला कोणाची मिळाली किती मतं?

पुरुष मतं - 13 टक्के
महिला मतं - 13 टक्के
मराठी मतं - 8 टक्के 

Axis MYINDIA Exit Poll: भाजप प्लसला जास्त मतं

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एग्झिट पोलचा पहिला डेटा एक्सिस माय इंडियाने जारी केला आहे. या एग्झिट पोलनुसार भाजप प्लसला पुरुषांची 40 टक्के मतं मिळाली आहेत. तर महिलांना 44 टक्के मतं मिळाल्याचा अंदाज आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्या विभागातील लोकांचं मतं कोणत्या पक्षाला आणि युतीला मिळालं, याचा अंदाज एक्सिस माय इंडिया एग्झिट पोलने सांगितला आहे.