महात्मा फुले जन आरोग्य योजने बाबत मोठा निर्णय, आता 'या' रुग्णालयांना ही बंधनकारक

आमदार सना मलिक यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी अतुल भातखळकर, राहुल कुल, अजय चौधरी यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यातील सर्व धर्मादाय म्हणजेच चॅरिटेबल रुग्णालयांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना बंधनकारक करण्यात आली आहे. या योजने सोबत आयुष्मान भारत योजना ही लागू करणे आता बंधनकारक असेल. याची प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल टाइम सनियंत्रण करणारी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली. ते विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात देताना बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आमदार सना मलिक यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी अतुल भातखळकर, राहुल कुल, अजय चौधरी यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. त्याला उत्तर देताना जयस्वाल यांनी महत्वाच्या गोष्टी सभागृहाला सांगितल्या.  ॲड. जयस्वाल म्हणाले, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी 10 टक्के खाटा मोफत आणि 10 खाटा सवलतीने राखीव ठेवणे बंधनकारक आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यात मुंबईप्रमाणे लोकलसेवा सुरू होणार? विधानसभेत सरकारचं उत्तर काय?

तसेच निर्धन रुग्ण निधी (आयपीएफ) मध्ये सर्वसाधारण रुग्णांकडून स्थूल बिलाच्या दोन रक्कम जमा करण्याची सक्ती आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवक नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिनस्त धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. रुग्ण तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समित्यांची नियुक्तीही करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.