महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला आला समोर, दादा- भाई आता काय करणार?

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप अॅक्शन मोडमध्ये आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही राज्यात येवून बैठका घेतल्या. विधानसभेच्या दृष्टीने आढावाही घेतला.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

रौनक कुकडे 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्रीत निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र लोकसभेत झालेल्या पराभवानंतर हे तिन्ही पक्ष सावध झाले आहेत. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखली जात आहे. जागा वाटपाबाबत भाजपने आपला प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार विधानसभेच्या 160 जागा लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. या जागांवर भाजप दावा करेल. उरलेल्या जागा या शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला देण्याची रणनिती भाजपने आखली असल्याचे सुत्रांकडून समजत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजप किती जागांवर लढणार? 

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप अॅक्शन मोडमध्ये आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही राज्यात येवून बैठका घेतल्या. विधानसभेच्या दृष्टीने आढावाही घेतला. बैठकीत विभागवार आढावाही घेतला गेला. त्यातून भाजपने 155 ते 160 जागा लढल्या पाहीजेत ही बाब पुढे आली. या जागांवर भाजप मजबूत स्थितीत असल्याचे शिंदे आणि अजित पवारांना पटवून दिले जाईल असेही समजत आहे. उललेल्या 128 जागा या शिंदे-पवार यांच्यासह मित्र पक्षांना दिल्या जातील. त्याबाबतचे गणितही भाजपचे तयार आहे. ज्यावेळी पक्षाचे प्रमुख नेते फडणवीस, शिंदे आणि अजित पवार एकत्र चर्चेसाठी बसतील तेव्हा भाजप आपली मागणी पुढे ठेवणार आहे. 

Advertisement

शिंदे गटाचा 100 जागांवर दावा   

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या आधीच विधानसभेच्या 100 जागा आपण लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्या जागांवर तयारीही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी तर शंभर पेक्षा एकही जागा कमी लढणार नाही असे जाहीर पणे सांगितले होते. तर मंत्री दिपक केसरकर यांनीही शिवसेना शंभर जागांवर तयारी करत आहे असे स्पष्ट केले. या जागा कमी होतील की जास्त होतील याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभेला शिवसेना शिंदे गटाने जागा घेताना तडजोड केली. मात्र विधानसभेला कोणत्याही स्थितीत तडजोड करणार नाही अशी ताठर भूमीका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  'विधानसभा निवडणूक महायुतीच्या नेतृत्वात लढणार'; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

अजित पवारांच्या वाट्याला किती जागा? 

महायुतील भाजप आणि शिवसेनेने आपण किती जागा लढणार हे सांगून टाकले आहे. भाजपने 160 जागांवर तर शिवसेना शिंदे गटाने 100 जागांवर दावा केला आहे. त्यामुळे शिल्लक केवळ 28 जागा राहतात. त्यामुळे अजित पवारांना केवळ वीस ते तीस जागा दिल्या जातील असे संकेत तर शिवसेना आणि भाजपने दिले नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र या आधीच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागा लढेल असे सांगितले होते. त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरेंची विधानसभेसाठीची रणनिती ठरली; संपर्कप्रमुखांना दिले महत्त्वाचे निर्देश)

महाविकास आघाडीचे काय? 

एकीकडे महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा होवू घातली आहे. त्याच वेळी महाविकास आघाडीही जागा वाटपा बाबत चाचपणी करत आहे. आघाडीतील तिन्ही मुख्य पक्षांनी समान जागा लढाव्यात अशी चर्चाही होत आहे. तर काँग्रेस मात्र जास्त जागांची मागणी करत असल्याचेही समोर आले आहे. तर शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला असून जास्ती जास्त जागा कशा पदरात पडतील याचा प्रयत्न सुरू आहे. तर जागा वाटपावरून कोणताही वाद नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. युतीची सत्ता घालवणे हे मुख्य उद्द्ष्ठ असल्याचे पवारांनी स्पष्ट केले होते.