'पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा, प्रीतम मुंडे यांनाही न्याय द्या' 'या' नेत्याची थेट मागणी

पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री का होऊ नये? त्या राज्याचा कारभार सांभाळू शकत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित करत एका नेत्यांने थेट त्यांना मुख्यमंत्री करा अशीच मागणी केली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
बीड:

स्वानंद पाटील

विधानसभा निवडणुकीसाठी आता राज्यातले वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्रिपदावरून महायुती बरोबरच महाविकास आघाडीतही अनेक जण इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना महायुतीतून मुख्यमंत्री व्हायचे आहे. तर उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील अशी इच्छुकांची यादी मविआमध्येही आहे. अशा आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ती म्हणजे भाजप आमदार पंकजा मुंडे यांची. पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री का होऊ नये? त्या राज्याचा कारभार सांभाळू शकत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित करत एका नेत्यांने थेट त्यांना मुख्यमंत्री करा अशीच मागणी केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ओबीसी आरक्षण बचाव पद यात्रेची सांगता बीडच्या गेवराई तालूक्यातील वडगाव ढोक येथे झाली. यावेळी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आपली मतं मांडताना मोठी मागणी केली आहे. पंकजा मुंडे यांना संघर्षाचा वारसा आहे. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या राज्याचे प्रतिनिधित्व करू शकतात. ओबीसींचे 100 आमदार निवडून आलेतर पंकजा मुंडेंनाच मुख्यमंत्री करा अशी थेट मागणी वाघामारे यांनी केली आहे. तर प्रीतम मुंडेंना देखील प्रतिनिधित्व द्यावे लागेल असे ते म्हणाले. शिवाय लक्ष्मण  हाके आणि आपण विधानसभेची निवडणूक लढणार नाही असे ही वाघामारे यांनी स्पष्ट केले. आम्हाला ओबीसींचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचे आहेत.आम्हाला ओबीसी समाज जागा करायचा आहे.असे वाघमारे यावेळी म्हणाले.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  महायुतीचं ठरलं? जागा वाटपासाठी शिंदे- फडणवीस- पवार एकत्र, नागपुरात मध्यरात्री काय झालं?

पंकजा मुंडे, छगन भुजबळ वडेट्टीवार यांच्यासारखे ओबीसी नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ओबीसींचे 100 आमदार झाले तर प्रीतम मुंडेंना देखील प्रतिनिधित्व द्यावे लागेल. 54 टक्के असलेल्या समाजाला सर्व पक्षांनी प्रतिनिधीत्व दिले पाहिजे.आम्हाला ओबीसीचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचे आहेत.आम्हाला ओबीसी समाज जागा करायचा आहे.असे वाघमारे यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ओबीसींचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे भडकले! 'गेट आऊट' ऑफ इंडिया करून दाखवा, मग्रुरीने माफी नको'

यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टिका केली. मनोज जरांगे हे विधानसभेला उमेदवार देऊ शकत नाही. त्यांचे मालक एकनाथ शिंदे आहेत.  शिंदे त्यांना उमेदवार देऊ देणार नाहीत. जरांगेंनी आठच उमेदवार निवडून आणून दाखवावेत असं आव्हानच नवनाथ वाघमारे यांनी दिलं. जरांगेंनी आता मराठा समाजाला फसवण्याचे काम बंद करावे. जरांगे निजामी मराठ्यांसाठी लढण्याचे काम करतात असा आरोपही त्यांनी यावेळी केला. जो माणूस चार दिवस उपोषण करतो, आणि पळून जातो. सरकारची फसवणूक करतो. असा आरोपही केला. जरांगेंनी 288 नाही तर फक्त 88 उमेदवार उभे करून दाखवावे असंही ते म्हणाले. जरांगेंचे मालक मुंबईत आहेत. मालकांनी चावी दिली की तेवढेच ते काम करतात. असं त्यांनी सांगितलं. 

Advertisement