वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे
- ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला
- मतमोजणीच्या वेळी CRPF जवानांनी उमेदवारांना मतमोजणी केंद्रात जाण्यापासून रोखल्याचा आरोप ममतांनी केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. असं असलं तरी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण पराभूत झालेलो नाही आणि राजीनामा देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजप, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्या राजीनामा देणार नसल्यामुळे बंगालच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या पत्रकार परिषदेतील १० प्रमुख मुद्दे
- राजीनामा देणार नाही- ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, त्या राजीनामा देऊन राजभवनात जाणार नाहीत. "मी हरलेली नाही, मी संघर्ष सुरूच ठेवेन," असे सांगत त्यांनी सत्तेच्या राजकारणापेक्षा लोकशाहीसाठी लढण्याला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले.
- निवडणूक आयोगावर निशाणा-ममता यांनी या निवडणुकीला 'ममता विरुद्ध निवडणूक आयोग' असा लढा संबोधले. 90 ते 95 टक्के मतदान कसे झाले, असा सवाल करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. न्यायव्यवस्थेकडूनही आपल्याला न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
- सीआरपीएफवर गंभीर आरोप-मतमोजणीच्या वेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी गुंडांसारखे वर्तन केले, असा खळबळजनक आरोप ममतांनी केला. उमेदवारांना मतमोजणी केंद्रात जाण्यापासून रोखले गेले, असेही त्या म्हणाल्या.
- कार्यकर्त्यांवर हल्ले-तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या घरांची जाळपोळ केली जात असून महिलांना धमक्या दिल्या जात असल्याचा दावा ममतांनी केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील हा अत्याचार सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
- मतमोजणीत फेरफार?-"मतमोजणी केंद्रावर माझ्या एजंटला प्रवेश दिला नाही. मला स्वतःला धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले," असा आरोप ममतांनी केला. भाजपच्या लोकांनी यंत्रणेचा वापर करून निकाल बदलल्याचा दावा त्यांनी केला.
- लोकशाहीची हत्या-केंद्र सरकारने निवडणूक प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करून लोकशाहीची हत्या केली आहे. महाराष्ट्र, बिहार आणि हरियाणात ज्या पद्धतीने भाजपने विजय मिळवला, तोच पॅटर्न बंगालमध्ये राबवला गेल्याचे त्यांनी सांगितले.
- निवडणूक आयुक्त 'व्हिलन'-मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ममतांनी 'व्हिलन' संबोधले. दिल्लीतून संदेश पाठवून मतमोजणी केंद्रे हायजॅक करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
- 'इंडिया' आघाडीचा पाठिंबा-सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या नेत्यांनी फोन करून आपल्याला पाठिंबा दर्शवल्याचे ममतांनी सांगितले. 'इंडिया' आघाडी एकत्रितपणे भाजपविरोधात लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- सरकारी यंत्रणेचा गैरवापर-निवडणुकीदरम्यान पोलीस यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय होती आणि भाजपने सरकारी यंत्रणेचा वापर करून अराजकता माजवली, असे ममता म्हणाल्या.
- फॅक्ट फाइंडिंग कमिटीची स्थापना-पक्षाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जात असले तरी त्यांची चिंता नाही, असे ममतांनी सांगितले. दरम्यान, ज्या भागात गडबड झाली आहे, तिथे जाऊन चौकशी करण्यासाठी तृणमूल काँग्रेस एक 'फॅक्ट फाइंडिंग कमिटी' स्थापन करणार आहे.