पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी स्वत:चेच खासदार कीर्ति आझाद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आझाद यांनी पक्षातील खासगी गोष्टी सार्वजनिक केल्याचा आरोप केला. आझाद यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेल्या कथित भांडणाच्या गोष्टी बाहेर लीक केल्याचा आरोप केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांमधील कथित भांडणाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी त्यांच्या सहकारी खासदारांवर ओरडताना दिसत आहेत. बॅनर्जी यांनी या प्रकरणात कीर्ति आझाद यांच्याकडं बोट दाखवल्यानं पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
होय, वाद झाला!
कल्याण बॅनर्जी यांनी या प्रकरणात त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात वाद झाल्याचं मान्य केलंय. या वादाचा खापर त्यांनी आझाद यांच्यावर फोडलं आहे. मी काय करावं हे या विषयावर आझाद मला बौद्धिक देत होते, त्यांनीच हे चॅट लीक केलं आहे असा आरोप बॅनर्जी यांनी केला.
( नक्की वाचा : CPM नं निवडला सीताराम येचुरींचा वारस, पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रांतीकारी निर्णय )
मालवीय यांनी शेअर केले स्क्रीन शॉट्स
अमित मालवीय यांनी यापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात 4 एप्रिल रोजी भांडण झाल्याचा दावा मालवीय यांनी केला होता. या वादाचे पडसाद पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरही उमटले, असं मालवीय यांनी स्पष्ट केलं. त्यांनी या प्रकरणात एका बहुमुखी आंतरराष्ट्रीय महिलेचा उल्लेख केला होता. त्यामुळे हे प्रकण आणखी चिघळलं.
मालवीय यांनी सांगितलं एक्स (X) वर लिहिलं की, बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे दोन खासदार निवडणूक आयोगात एक पत्रक देण्यासाठी गेले होते. तिथं त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षानं त्यांच्या खासदारांना एकत्र येऊन पत्रकावर स्वाक्षरी करावी आणि नंतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात यावं. पण, ज्या खासदाराकडं हे पत्रक होतं ते खासदार संसद भवनात आलेच नाहीत. ते थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले.
पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
तृणमूलचे अन्य खासदार या कारणामुळे नाराज झाले. त्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीपर्यंत गेल्याचा मालवीय यांनी सांगितलं. बॅनर्जी यांनी दोन्ही खासदारांना शांत राहण्याचे निर्देश दिले.
त्यानंतरही हे प्रकरण शांत झालं नाही. मालवीय यांनी काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. ते स्क्रीनशॉट 'एआयटीसी (AITC) एमपी 2024' नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपचे असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते या ग्रुपवर एकमेंकावर आरोप करत आहेत, असं मालवीय यांनी लिहिलं आहे.