Exclusive : आता उपोषण नाही इलेक्शन! जरांगे पाटलांचं ठरलं, वाचा संपूर्ण प्लॅन

Manoj Jarange Patil enter in electoral politics : लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
M
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Manoj Jarange Patil enter in electoral politics मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचं राजकारण ढवळून काढलं आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांची ताकद राज्यात दिसली. मराठवाड्यात रावसाहेब दानवे तसंच पंकजा मुंडे हे भाजपाचे मातब्बर उमेदवार पाडण्यात 'जरांगे फॅक्टर' निर्णयाक ठरला. मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागातही या फॅक्टरचा महायुतीला बसला. लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आजवर उपोषण करणारे जरांगे पाटील विधानसभा निवडणूक कशी लढणार? या निवडणुकीत त्यांची रणनीती कशी असेल? जरांगे पाटील किती जागा लढणार? कुणाला टार्गेट करणार? या सर्व विषयांची सविस्तर उत्तरं जरांगे पाटील यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्स्कुलझिव्ह मुलाखतीमध्ये दिली आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे जरांगेंचा इलेक्शन प्लॅन?

विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागांवर उमेदवार देण्याचं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. चारही पक्षातल्या तिकीट न मिळालेल्या उमेदवारांना जरांगे संधी देणार आहेत. मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, जलसिंचनाचे प्रश्न हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य भाग असेल. मुस्लिम समाजाला आरक्षण आणि धनगर समाजाचा आरक्षण हा ही प्रचाराचा मुद्दा असेल. निवडून आल्यावर हे आरक्षण देण्याचं आश्वासन जरांगे यांनी दिलं आहे. 

मराठवाडा हा जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण, त्यांनी पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात मेळावा घेणार असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईत मेळावे घेणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : 'तुम्ही जिवंत असेपर्यंत भाजपची एकही सीट निवडून आणू नका' )
 

आता उपोषण नाही...

मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण नाही तर निवडणुकीत सहभाग घेऊन सत्तेत येणं हाच हेतू असल्याचं 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये जाहीर केलं आहे.  मराठा समाज आणि सर्व जाती धर्माच्या मंडळींना उमेदवारी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक नियोजन ठरलं आहे. प्रत्येक मतदारसंघात चाळीस हजार मराठा मतं आहेत तिथे प्राधान्याने उमेदवार देणार आहे असं त्यांनी जाहीर केलं.

'महायुतीचे 113 उमेदवार पाडणार'

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसला होता. आता विधानसभेतही त्यांचं महायुती हे मुख्य लक्ष्य आहे. महायुतीचे 113 आमदार पाडण्याचं नियोजन केल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये जाहीर केलं. सामाजिक चळवळी राजकारणात आल्या की अपयश येतं याचा देशभरचा अभ्यास करून रिंगणात उतरणार आहोत. लोकसभेला समाजाची ताकद कळाल्यामुळे विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. 

Advertisement