जरांगे पाटील विधानसभेला कुणाला तिकीट देणार? वाचा अटी, शर्थी आणि नियम!

Jarange Patil in Election : मनोज जरांगे यांनी त्यांची निवडणूक रणनीती आणखी पुढं नेली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप कसं करणार याबाबतच्या सर्व अटी जरांगे यांनी जाहीर केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर आजवर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये जरांगे यांनी सर्व 288 मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता दोन दिवसांनी जरांगे यांनी त्यांची निवडणूक रणनीती आणखी पुढं नेली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप कसं करणार याबाबतच्या सर्व अटी जरांगे यांनी जाहीर केल्या आहेत.


 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इच्छूक उमेदवाराला काय करावं लागेल?

-  जरांगेंच्या पाठींब्यावर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना मतदारसंघातील जातीनिहाय मतदार संख्या सादर करावी लागेल

- इच्छुकांना स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल. 

- 7 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. 

- अर्जाच्या छाननीसाठी 11 किंवा 21 सदस्यांची कोअर समिती स्थापन केली जाणार आहे. 

- ती समिती अर्ज छाननी करून जरांगे-पाटील यांना माहिती देईल

- समितीनं दिलेल्या माहितीच्या आधारे जरांगे - पाटील उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील

( नक्की वाचा : मराठ्यांना आरक्षण का हवं? मागसवर्गीय आयोगानं सांगितलं महत्त्वाचं कारण )
 


उमेदवारांसाठी कोणत्या अटी?

- विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे.

 - उमेदवार निर्व्यसनी तसंच चळवळीत सक्रिय हवा.

-  जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती आवश्यक

- तालुक्याच्या प्रश्नांची जाण हवी

- मतदारसंघातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असणे आवश्यक

- मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार, याचीही माहिती घेतली जाणार आहे.


( नक्की वाचा : Exclusive : आता उपोषण नाही इलेक्शन! जरांगे पाटलांचं ठरलं, वाचा संपूर्ण प्लॅन )