महायुती सरकारचा शपथविधी झाला आहे. नवं सरकार राज्यात आलं आहे. एकनाथ शिंदे जावून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. अशा वेळी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. शिवाय त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या आहेत. शिवाय आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. नाही तर मराठे पुन्हा आंदोलनात उभं करतील. त्यातून सरकारलाच त्रास होईल असा इशाराही या निमित्ताने जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असं ही ते म्हणाले. त्यामुळे जरांगे आगामी काळात सरकार विरोधात आक्रमक होणार आहेत याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यातून जरांगे आणि महायुती यांच्यातील संघर्ष हा अटळ असेल.
ट्रेंडिंग बातमी - खातेवाटपावरून महायुतीत ओढाताण? गृहच्या बदल्यात 'हे' खातं देण्याची भाजपची तयारी
यावेळी जरांगे यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. कायद्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली आहे. तिघांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची आहे. नाटकबाजी बंद करायची आहे असं जरांगेनी ठणकावलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामुहीक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असंही ते यावेळी म्हणाले. समाजाला सांभाळायचं, शिकायचं आहे. जनतेने तुम्हाला निवडून दिलय, तुम्ही जनतेचं मन जिंकायचं काम करा असं आवाहन जरांगे यांनी महायुती सरकारला केलंय.
ट्रेंडिंग बातमी - 'पक्षाने माझी किंमत केली पाहिजे' भाजपचे सर्वात सिनिअर आमदार थेट बोलले
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट आहे. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल असं जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला उत्तर देताना म्हटलं आहे. आम्ही आमच्या उपोषणावर ठाम असल्याचं सांगत आमचा समाज बरळवाडी करणाऱ्याला किंमत देत नाही असं जरांगे म्हणाले. त्यामुळे नवं सरकार आता काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.