'कुणाचा कसा गेम करायचा ते मला कळतं' सत्तारांचे ते वक्तव्य, निशाणा कोणावर?

सत्तार यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. एकीकडे त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना सुचक इशारा दिला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
जालना:

शिवसेना शिंदे गटात सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. आधी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. तसे सत्तार या आधीही आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चत राहीले आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एक नवे विधानस केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यात ते कोणाचा कसा गेम करायचा ते मला समजतं असं स्पष्ठ पणे बोलत आहेत. शिवाय कोणाचा गेम झाला हेही सांगत आहेत. त्यामुळे तर सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अब्दुल सत्तार हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. शिवाय ते कॅबिनेट मंत्रीही आहेत. ते नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा असं काही एक विधान केलं आहे त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. मै हसते रहता हू, आधे दुष्मनो को तो ऐसे ही मार देता हूं. अशा पद्धतीने भाषणाला सुरूवात केली. मात्र पुढे बोलताना ते म्हणाले की मला राजकारणाची पार्श्वभूमी नाही. माझ्या घरात साधा कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हता. पण आता कोणाला दिल्ली पाठवायचं आहे? कोणाला घरी बसवायचं आहे? याची मला आयडिया आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ते थरारक 48 तास! पुराच्या पाण्यात अडकली भारतीय महिला क्रिकेटपटू, सुटकेसाठी काय केलं?

ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सांगितलं की संदिपान भूमरे यांना आपणच दिल्लीला पाठवले. त्यांना जर दिल्लीला पाठवले नसते तर मी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री झालो असतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. पण हे सर्व राजकारणात करावं लागतं. नक्कल करायलाही अक्कल लागते. कधी, कुठे, कोणाचा गेम करायचा आहे हे मला बरोबर समजतं असं म्हणत त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना सुचक इशाराच या निमित्ताने दिला आहे. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ ही काढले जात आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांचे काम केल्याचा आरोप आहे. सत्तार यांनीही ही बाब कधी नाकारली नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी कल्याण कालेंचे काम केले.  कल्याण काळे हे आमचे जुने मित्र आहेत असेही सत्तार यांनी सांगितले. सत्तार यांनीच रावसाहेब दानवे यांचा गेम केल्याची चर्चा मतदार संघात आहेत. त्यामुळे दानवे यांना एक लाखा पेक्षा अधिक मतांनी पराभव सहन करावा लागला. त्यानंतर दानवे यांनीही सत्तारां विरोधात दंड थोपटले आहे. सिल्लोडमध्ये दानवे सक्रीय झाले आहेत. त्यामुळेच सत्तार यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. एकीकडे त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना सुचक इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आपल्या विरोधकांनाही योग्य संदेश यातून देण्याचा प्रयत्न सत्तारांनी केला नाही ना अशीही चर्चा आहे. 
 

Advertisement