Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?

आपल्या वक्तव्याचं राजकारण केलं गेलं. आपल्या वक्तव्याचा राजकारणासाठी वापर केला गेला असंही ते यावेळी म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. त्यांच्यावर चारही बाजूने टीकेची झोड उठव्यानंतर कदम यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यातही मोठी चुक केली. मी जे काही बोललो ते पोलिसांनी मला सांगितलं तेच बोललो असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून ही नवा वाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्यावेळी स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार होत होते त्यावेळी त्या तरुणीने आरडाओरड केला नाही. विरोध ही केला नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला, असे वादग्रस्त वक्तव्य कदम यांनी केले होते. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची ही मागणी विरोधकांनी  केली. मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कान टोचत विधान करताना काळजी घ्या असा सल्ला दिला होता. अशा संवेदनशिल प्रकरणात जपून बोला असंही ते म्हणाले. त्यावरून आता कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Swargate Rape Case: पीडितेसोबत सहमतीने संबंध? स्वारगेट अत्याचार प्रकरणात 5 खळबळजनक खुलासे

महिलांवर अत्याचार होणार नाहीत, याची काळजी आमचे सरकार घेत आहे. महिला अत्याचाराबाबत हे सरकार गंभीर आहे. त्याबाबत आपण स्वत: सर्व पोलिस आयुक्तांना आदेश दिले आहेत अस योगेश कदम म्हणाले. हे सरकार लाडक्या बहीणांचे आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे महिलांबाबत आमच्या मनात आदर आहे, असं सांगायला ही कदम विसरले नाहीत. मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'तुझ्या मामाने बोलावलंय, चल'; 16 वर्षांच्या मुलीला सोबत नेलं अन्..., वाशिममधील धक्कादायक प्रकार

आपल्या वक्तव्याचं राजकारण केलं गेलं. आपल्या वक्तव्याचा राजकारणासाठी वापर केला गेला असंही ते यावेळी म्हणाले. पिडितेला कुणीच कसं वाचवायला गेलं नाही. यावर पोलिसांनी जी माहिता आपल्याला सांगितली तिच आपण जाहीर पणे सांगितली असं ही ते म्हणाले. म्हणजेच त्यांचे जे काही वादग्रस्त वक्तव्य होते ते पोलिसांचे होते असचं सांगण्याचा प्रयत्न कदम यांनी केला. झालेला प्रकार हा गंभीर आहे. त्यामुळे पिडीतेला याबाबत लवकर न्याय मिळावा यासाठी पोलिस प्रयत्नशिल असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Swargate case : आरोपीच्या मुसक्या आवळल्या, एक लाखांचं बक्षीस कुणाला मिळणार? पुणे पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्याबाबत आपण अधिक काही बोलणार नाही. मात्र या पुढे अशा प्रकारच्या संवेदनशिल प्रकरणात नक्कीच काळडी घेवू असंही ते म्हणाले. विरोधकांकडून सध्या सुरू असलेलं राजकारण त्यांनी थांबवलं पाहीजे असं ही ते म्हणाले. आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना हातात आयतं कोलीत देण्याचं काम झालं याची कबुलीही त्यांनी दिली.