'...तर मोदी सरकार कोसळेल', बड्या नेत्याचा बडा दावा का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळेल असे भाकीत बड्या नेत्याने केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होवू शकते. सध्याचे वातावरण पाहात महाराष्ट्रात सत्ता बदल अटळ असल्याचा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. शिवाय हरियाणातही काँग्रेसची सत्ता येत आहे असे चव्हाण म्हणाले. जर या दोन राज्यात सत्तांतर झाले तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळेल असे भाकीत त्यांनी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठींबा काढून घेतील असा दावा ही चव्हाण यांनी केला आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्याचे मोदी सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठींब्यावर उभं आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर हे दोघेही सरकारचा पाठींबा काढतील आणि केंद्रातलं मोदी सरकार कोसळेल असे त्यांनी सांगितले. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकारही तेरा महीन्यात कोसळले होते याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली . महाराष्ट्रातील जनतेने जर राज्यात सत्तांतर घडवून आणलं तर हे शक्य आहे असेही ते म्हणाले. सध्याच्या स्थितीत मोदी सरकार फार काळ टिकणार नाही असेही ते म्हणाले. हरियाणा आणि महाराष्ट्रातले सत्तांतर पाहून चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे सरकारमधून बाहेर पडतील असा त्यांनी दावा केला. 

ट्रेंडिंग बातमी - दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळावे! अर्ज कोणी केला? ठाकरे की शिंदे गटाने?

राज्यातली सध्याची स्थिती वाईट आणि निराशा निर्माण करणारी आहे. त्यात विधानसभेच्या निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत. बदलापूरची झालेली दुर्घटना, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा यामुळे सरकार विषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेत त्यांच्या विषयी चिड आहे. त्यामुळे या वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल असा गौप्यस्फोटही त्यांनी या निमित्ताने केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीकडून काय प्रतिक्रीया येत हे पहावे लागणार आहे.  

ट्रेंडिंग बातमी - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर! केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय

राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. देशात कधीही असा पुतळा कुठेही कोसळला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात सरकार विषयी चिड निर्माण झाली आहे. त्याच्या संतप्त भावनाही उमटल्या आहेत. तर बदलापूर प्रकरणानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फटका राज्यात भाजपला नक्की बसेल असे ही ते म्हणाले. शिवाय महाविकास आघाडीचा निवडणुकीत विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

Advertisement