राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी प्रत्येक जोडप्याला 3 आपत्य जन्माला घालण्याच सल्ला दिला आहे. शिवाय त्यांनी घटत चाललेल्या लोकसंख्येवर चिंता ही व्यक्त केली आहे. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको असं लोकसंख्येचं शास्त्र सांगतं असं ते म्हणाले आहे. पॉईंट एक अशी माणसं जन्म घेत नाहीत. त्यामुळं दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असं स्पष्ट मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे ते नागपूरात बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूरच्या कठाळे कुल संमेलनात मोहन भागवत आले होते. यावेळी त्यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. तरूण पिढीतील जोडपी सध्या मुलं जन्माला घालण्यासाठी उत्सुक नाहीत. ही फार चिंता करण्याची बाबत असल्याचे ते यावेळी म्हणाले. शिवाय सध्याची लोकसंख्या कमी होत आहे. हा चिंतेचा विषय म्हणावा लागेल. लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो. तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो.अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले, असं ही ते यावेळी आवर्जून म्हणाले.
ते येवढावर थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्येक जोडप्याला दोन पेक्षा जास्त अपत्य असली पाहीजे असही सांगितलं. आपल्या देशाची लोकसंख्या नियोजनाची पद्धत ही वर्ष 2000 च्या जवळपास ठरली आहे. त्यानुसार लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये असं स्पष्ट सांगितलं आहे. आता पॉईंट एक माणूस जन्म घे नाही. मग जर 2.1 एवढा लोकसंख्या वाढीचा दर पाहिजे असेल, तर प्रत्येक जोडप्याला दोन पेक्षा जास्त अपत्य पाहिजे, कमीत कमी तीन अपत्य असली पाहिजे असं ही ते म्हणाले. देशाच्या भविष्यासाठी योग्य लोकसंख्या वाढीचा दर राखणं महत्त्वाचं आहे असा दावा ही त्यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - भाजपने आधी ठाकरेंना फसवलं आता एकनाथ शिंदेंची फसवणूक, बड्या नेत्याचा बडा आरोप
दरम्यान मोहन भागवतांच्या या विधानाची चर्चा सगळीकडे होत आहे. त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ ही काढले जात आहेत. प्रत्येक जोडप्याला तीन मुलं असली पाहीजे असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य किती जणांना पटते हे ही तितकेड महत्वाचे आहे. सध्याच्या महागाईच्या जमान्यात एका मुलाला सांभाळणे कठीण झाले आहे. अशा वेळी तीन मुलांना कसे साभाळायचे हा खरा प्रश्न आहे.