उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरात झालेल्या दंगलीचा ए टू झेड घटनाक्रम सांगितला. सोमवारी रात्री नागपूरात झालेली घटना ही घटना दुर्दैवी होती असं शिंदे म्हणाले. मोमीनपूरा महाल भागात जमावाने एकत्र येवून काही घरांना लक्ष्य केलं. शिवाय जाळपोळ ही केली. मोठ्या प्रमाणावर त्या भागात मालमत्तेचं नुकसान केलं. काही लोकं तर जीवानिशी वाचली असं वातावरण तयार झालं होतं. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तो क्षण अंगावर काटा आणणारा होता असंही ते म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्यावेळी हिंसाचार होत होता त्यावेळी तिथे पोलीस आले. त्यांच्यावर ही दगडफेक झाली. चार डीसीपी हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. काही लोकांनी तर पोलीसांवर कुऱ्हाडीने वार केले. त्यांच्याकडे हत्यारं होती. या हल्ल्यात पेट्रोल बॉम्ब टाकले गेले असंही एकनाथ शिंदे म्हणाले. या सर्व बाबी पाहाता हा सर्व पुर्व नियोजित कट होता, असंही शिंदे यांनी यावेळी माध्यमांबरोबर बोलताना सांगितलं.
मोमीनपूरात या भागात मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जाता. पण दंगली वेळी एकही गाडी त्या ठिकाणी पार्क नव्हती. त्यानंतर नियोजन पद्धतीने दगडफेत केली गेली. या हल्ल्यात लहान मुलांकडेही पाहीलं नाही. त्यात एक पाच वर्षाची मुलगी बचावली आहे. त्या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे. त्यालाही लक्ष्य केलं गेले. हॉस्पिटलमध्ये असलेल्या देव-देवतांची विडंबना केली गेली. या प्रकराची घटना समाजकंठकांनी केल्याचे शिंदे यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - Crime News: सेल्फीमुळे पकडला गेला चोर, उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच साधत होता डाव
पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखतात. पण त्यांच्यावरच हल्ला केला गेला. आगी लावण्यात आली. ती बुजवण्यासाठी अग्नीशमन दलाची गाडी आली होती. त्यालाही आग लावण्यात आली. हा एक भ्याड हल्ला होता. त्याचा आपण निषेध करतो, असं ही शिंदे यांनी सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला झाला ही दुर्दैवी बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. असा या समाजकंठकाना शोधून कडक कारवाई केली जावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. हा पूर्व नियोजित कट होता असं ही ते म्हणाले.