Narendra Modi: हिंदू सेनेचा विरोध मोदींनी झुगारला, अजमेर दर्ग्याबाबत एक निर्णय अन् लाखोंची मनं जिंकणार

हिंदू सेनेनं जरी चादर पाठवू नये अशी मागणी केली असली तरी मोदीं चादर पाठवणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

अजमेर शरीफला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तर्फे चादर चढवणार आहेत. ही चादर 4 जानेवारीला चढवली जाईल. अजमेर शरीफ इथं यावर्षी 813 उर्स होत आहे. मोदी गेल्या दहा वर्षापासून या उर्सला चादर पाठवतात. हे त्यांचे चादर पाठवण्याचे 11 वे वर्ष आहे. मात्र यावरुन यावर्षी वाद निर्माण झाला आहे. अजमेर शरीफला मोदींनी चादर पाठवू नये अशी मागणी हिंदू सेनेनं पत्राद्वारे मोदींकडे केली होती. अजमेर शरीफची दर्गा हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. असंही या पत्रात सांगितलं आहे. मात्र असं असलं तरी मोदींनी चादर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 हिंदू सेनेनं जरी चादर पाठवू नये अशी मागणी केली असली तरी मोदीं चादर पाठवणार आहेत. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चादर घेतली. त्यानंतर ती चादर ते  अजमेरला घेऊन जाणार आहेत. 4 जानेवारीला अजमेरच्या दरग्यामध्ये ही चादर चढवली जाणार आहे. आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वेळा दर्ग्यावर चादर चढवली आहे. हे त्यांचे 11 वे वर्ष आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Chandu Chavan: 'माझे भारतीय नागरिकत्व रद्द करा' सैन्यात काम केलेला जवान असं का म्हणाला?

अजमेर शरीफ दरगाहला 850 वर्षाचा इतिहास आहे. मात्र हा दर्गा नसुन इथं शिव मंदिर होतं. असा दावा हिंदू सेनेचा आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी हा दावा केला आहे. शिवाय या बाबत कोर्टात केसही सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. अशा स्थिती पंतप्रधानांनी तिथं चादर पाठवणं योग्य ठरणार नाही. त्यातून दबाव निर्माण होईल. शिवाय संबधित याचिकेवरही दाबव येईल. असंही ते म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - Kolhapur News: अंत्यविधीची तयारी अन् तात्या पुन्हा जिवंत, सिनेमालाही लाजवेल अशी स्टोरी; कोल्हापूरमध्ये अजब घडलं

दरम्यान अजमेरच्या दर्ग्याच्या इथं शीव मंदीर होते असा हिंदू संघटनांचा दावा आहे. या प्रकरणात अजमेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी घेतलेला चादर पाठवण्याचा निर्णय महत्वाचा समजला जात आहे. त्याला एक विशेष महत्वही प्राप्त झाले आहे.