राम गणेश गडकरी गडकरी यांच्या 'संपूर्ण गडकरी' या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केली आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीचे लिहीले गेले असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारच्या साहित्य आणि सांस्कृतीक मंडळाने हे पुस्तक प्रकाशीत केल्याचं ते म्हणाले. शिवाय त्यांनी गडकरींच्या लिखाणावरही आक्षेप नोंदवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संपूर्ण गडकरी या पुस्तकात सात नाटकाचा समावेश आहे. त्यात राज सन्यास हे एक नाटक आहे. ते छत्रपती संभाजी महाराजांवर आहे. मात्र त्यात महाराजांची बदनामी केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदल खूप चुकीचा इतिहास लिहिण्यात आला आहे. राम गणेश गडकरी हे कधीच चांगलं लिहत नव्हते असंही ते यावेळी म्हणाले.
शिवाय राम गणेश गडकरी हे कायम दारू पिऊन लिखाण करायचे. ते एक विकृत लेखक होते. असं खळबळजनक वक्तव्य ही मिटकरी यांनी केले आहे. या पुस्तकावर तात्काळ बंदी घातली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगिले. ही बाब सरकाच्या लक्षात आणून देणं हे माझं काम आहे. ऐकलं तर ठीक नाही तर मी प्रयत्न केला यात समाधानी आहे, असं मिटकरी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - MLA Salary: आमदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकाल तर म्हणाल...
सदर पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा मलिन होईल अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली आहे, असा मिटकरींचा दावा आहे. अशा आक्षेपार्ह पुस्तकावर बंदी आण्यासाठी समितीची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.