बारामती कोल्हापूरसह 11 मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभेचा राज्यातल्या तिसरा टप्पा आजपासून (शुक्रवार)  सुरू होत आहे. या टप्प्यात बारामती कोल्हापूरसह 11 मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. 19 एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.  या मतदार संघात 7 मे ला मतदान होणार आहे. 

तिसऱ्या टप्प्यात कोणते मतदार संघ?
राज्यातील 11 लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज आजपासून ( 12 एप्रिल )सुरू होत आहे. यामध्ये बारामती, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, माढा, सोलापूर, लातूर, धाराशिव, आणि रायगड या 11 मतदारसंघांत समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अधिसुचना जारी केली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना आपेल उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 

हेही वाचा - इंदिरा गांधींनंतर मोदी, 58 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानाबाबत जुळला 'हा' योग

कोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
यात सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, शाहू महाराज, संजय मंडलीक, प्रणिती शिंदे, सुनिल तटकरे, विनायक राऊत, अनंत गिते, ओमराजे निंबाळकर, राजू शेट्टी, हे प्रमुख उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत. यावेळी उमेदवारांकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नेत्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्यातले प्रमुख नेतेही उपस्थित राहातील. 

हेही वाचा - 'आणखी एका जागतिक वावटळीसाठी तयार व्हा' उदय कोटक थेट बोलले

मतदार संघात मतदान कधी? 
तिसऱ्या टप्प्यात एकूण 11 मतदार संघात निवडणूक होणार आहे. त्यासाठी 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 19 एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्जाची छाननी 20 एप्रिलला होईल. तर 7 मे ला या मतदार संघात मतदान होणार आहे. 

Advertisement

हेही वाचा - मायावतींनी उत्तरप्रदेशाऐवजी नागपुरातून निवडणूक अभियानाची सुरुवात का केली?