'POK ताब्यात घेण्याची हीच संधी, हल्ल्याची सुरुवात पाकने केली, शेवट भारत करणार'

Pok ताब्यात घ्यायला पाहिजे अशी सर्वांचीच मानसिकता आहे. त्याबाबतचा निर्णय हा पंतप्रधान व गृहमंत्र्यांचा आहे असं ही ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

जम्मू कश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले होते. मात्र त्यानंतर पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमावर्ती  भागात गोळीबार केला. भारताने गुरुवारी रात्री पाकिस्तानात अनेक ठिकाणी हल्ले करत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. हल्ल्याची सुरुवात पाकिस्तानने केली, त्यामुळे शेवट हा भारत करणार अशी असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 26 पर्यटकांना मारणाऱ्यांना पाकिस्तान पोसत आहे. त्यामुळे भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले असे ही ते म्हणाले. भारतानंतर बलुचीस्थान हा देखील पेटलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आता एक-दोन नव्हे तर तीन तुकडे होणार असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Pok ताब्यात घ्यायला पाहिजे अशी सर्वांचीच मानसिकता आहे. त्याबाबतचा निर्णय हा पंतप्रधान व गृहमंत्र्यांचा आहे. त्यामुळे जनता जर या गोष्टीचा विचार करत असेल तर निश्चितच पंतप्रधान व गृहमंत्री ही याबाबत विचार करत असतील. त्यामुळे POK ताब्यात घेण्याची ही चांगली संधी आहे. असं गुलाबराव पाटल यावेळी म्हणाले. पाकिस्तानची लांबी ही केवळ फक्त 250 किलोमीटर असून, त्यामुळे भारताकडे असलेल्या अत्याधुनिक मिसाईलमुळे पाकिस्तानला कव्हर करणे हे सहज शक्य असल्याचीही गुलाबराव पाटील म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

जम्मू कश्मीर मधील पेहलगांमध्ये महिलांना सोडून त्यांच्या पतींना दहशतवादांनी लक्ष करत हत्या केली होती. याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. त्यानंतर चीनच्या जोरावर उड्या मारणाऱ्या पाकिस्तानने भारताला दिलेल्या धमक्या या पोकळ होत्या. सीमेवर केलेला गोळीबार यामुळे भारताने दिलेल्या चोख उत्तरामुळे पाकिस्तान इतर देशांकडे आता याचना करत आहे. त्यामुळे सिंदूर पुसणे एवढं सोपं नाही हे भारताने दाखवून दिले आहे. हिंदुस्थानातील सर्व भाऊ हे बहिणींच्या पाठीमागे उभे आहेत, हेच भारत सरकारने सिद्ध केल्याची भावना ही गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली आहे.

Advertisement