संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर बीडचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड असल्याचा आरोप होत आहे. शिवाय खंडणी वसूली प्रकरणातही कराड तुरूंगात आहे. अशा वेळी धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करतच आहेत. पण महायुतीतील घटक पक्ष ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. त्यात आता पंकजा मुंडे यांनी राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. असं असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की कुठे दबाव आहे. मला कुठेबही दबाव दिसत नाही. असं वक्तव्य करत त्यांनी थेट धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. शिवाय राजीनामा घ्यायचा की नाही हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं नकळत म्हणत त्यांनी चेंडू फडणवीस अजितदादांच्या कोर्टातही टोलवला. त्यातून त्यांनी एका दगडात दोन पक्षी ही मारल्याची चर्चा होत आहे.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नाही. दोषी नसल्यास कुणावरही अन्याय व्हायला नको असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय. जालन्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी बोलत होत्या. सगळया गोष्टी तपास यंत्रणांवर अवलंबून आहेत. असं सांगत या प्रकरणात संबंध आढळून आल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचं नामदेव शास्त्री यांनी जाहीर केलं आहे. यावर बोलताना ही त्यांची वैयक्तीक भूमिका आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे यांचं नामदेव शास्त्री यांनी समर्थन केलं यावर प्रतिक्रिया देणं मला आवश्यक वाटत नाही असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. नामदेव शास्त्री यांच्यावर ही अधिक काही बोलण्यास पंकजा यांनी नकार दिला.