धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. पण आता पुढे काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मुंडेंच्या जागी अन्य कुणाला संधी दिली जाणार आहे का? की ही जागा रिक्त ठेवून योग्य वेळी ती भरण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.हे प्रकरण इतकं गंभीर आहे की मुंडेंना त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर त्याच नक्कीच परिणा होणार आहे. असं असलं तरी पुढच्या सहा महिन्यात याच धनंजय मुंडेंचे राजकीवर पुनर्वसन केले जाईल असं वक्तव्य एका नेत्याने केले आहे. या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सर्व नाटक आहे. त्यांना पुढच्या 6 महिन्यात परत राज्यमंत्री मंडळात घेतलं जाईल असं वक्तव्य काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे अतिशय जवळचे समजले जातात. त्यामुळे त्यांचे कमबॅक होवू शकतो अशी ही चर्चा आहे. शिवाय राजीनामा घ्यायचा होता तर आधीच का घेतला नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला शंका घेण्याची जागा आहे.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
धनंजय मुंडेंचा राजीनामा हा खूप उशिरा झाला आहे. असं ही त्या म्हणाल्या. संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या झाली. त्याच वेळी तो राजीनामा झाला पाहिजे होता. हे सरकार निगरगट्ट आहे. ज्यावेळी त्यांची हत्या केली गेली, त्यावेळी व्हिडीओ काढला गेला. हा व्हिडीओ कुणी काढायला सांगितला असा प्रश्न ही शिंदे यांनी केला. कोणाच्या ऑर्डरने तो व्हिडिओ काढला याचा तपास झाला पाहिजे असं ही त्या म्हणाल्या.
(नक्की वाचा- Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडेंना दणका; CM फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश?)
राजीनामा देताना धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारण दिलं आहे. हे कारण हास्यास्पद आहे. असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. धंनजय मुंडे यांचा नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा झाला पाहिजे होता . आरोपी म्हणून त्यांचं नाव यायला पाहिजे होतं. राजीनामा देऊन परत यांना सहा महिन्यांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, असं ही त्या म्हणाल्या. स्वारगेटचा विषय असेल मस्साजोगचा असेल त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राहिला नाही. हे सगळे सत्ते साठी हपापले आहेत, असं त्या शेवटी म्हणाल्या.