कसब्यात भाजपाचा उमेदवार कोण? कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर, तर नेते म्हणतात...

Pune BJP : यंदाच्या निवडणुकीत कसबा पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. त्याचवेळी या मतदारसंघातील उमेदवारीवरुन भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पोस्टरबाजी रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील कसबा विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला होता. गिरीश बापट यांनी 1995 ते 2019 पर्यंत सलग 24 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. बापट पुण्याचे खासदार झाल्यानंतर भाजपाच्याच मुक्ता टिळक 2019 मध्ये कसब्याच्या आमदार झाल्या. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपाला पराभवाचा धक्का बसला. काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत कसबा पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. त्याचवेळी या मतदारसंघातील उमेदवारीवरुन भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पोस्टरबाजी रंगली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणामध्ये पोस्टर वॉर?

भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि हेमंत रासणे यांच्या समर्थकांकडून शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत. 'लगालो दम आ रहे हम' 'अब की बार धीरज घाटे आमदार' असे पोस्टर धीरज घाटे यांच्या समर्थकांकडून शहरात लावण्यात आले आहेत. घाटे गेल्या काही टर्मपासून कसबा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. 

धीरज घाटेंप्रमाणेच हेमंत रासने यांचे बॅनर देखील पुणे शहरामध्ये लागली आहेत. #एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व तयार है हम! करण्यासाठी कसब्यातील समस्यांचा अंत आमदार होणार रासने हेमंत अशी ही बॅनर्स 'फ्रेंड्स ऑफ हेमंत रासने कसबा मतदारसंघ' यांनी लावली आहेत. 

नेते काय म्हणाले?

कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर रंगलेलं असतानाच कोणताही वाद नसल्याचं धीारज घाटे आणि हेमंत रासणे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता आमदार व्हावा अशी भावना असते. भाजपामध्ये कोणताही नेता तिकीट मागू शकतो, असं धीरज घाटे यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

तर, भाजपा लोकशाही जपणारा पक्ष आहे. त्यामध्ये प्रत्येकाचं मत जाणून घेतलं. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम करतो. त्यामध्ये कार्यकर्ते आहेत. उत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया प्रतिसाद, ही हेल्दी स्पर्धा आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंत स्पर्धा आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व जण एकदिलानं कमळासाठी काम करतील, असं हेमंत रासणे यांनी सांगितलं