स्मृती इराणींसाठी राहुल गांधी मैदानात, नक्की काय झालं?

पराभवानंतर सोशल मीडियावरून अनेक मीम्सही व्हायरल झाली. येवढेच नाही तर त्या बंगला कधी खाली करणार यावरही सोशल मीडियावर चर्चा झाली. यावरूनही इराणी यांच्यावर टिका झाली.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदार संघातून पराभव झाला. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. पराभवानंतर सोशल मीडियावरून अनेक मीम्सही व्हायरल झाली. येवढेच नाही तर त्या बंगला कधी खाली करणार यावरही सोशल मीडियावर चर्चा झाली. यावरूनही इराणी यांच्यावर टिका झाली. हे सर्व होत असताना काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्मृती इराणी यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी स्मृती इराणींसाठी उचलेल्या या पावलामुळे सर्वांच्याच भूवया मात्र उंचावल्या आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राहुल गांधीचे स्मृती इराणींसाठी ट्वीट 

स्मृती इराणी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. खास करून सोशल मीडियावर त्यांना लक्ष केले जात आहे. त्यांची मीम्सही व्हायरल होत आहेत. याची गंभीर दखल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. त्यांनी ट्वीट करत स्मृती इराणी यांची बाजू घेतली आहे. विजय - पराजय होत असतो. हा जिवनाचा एक भाग आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांना ट्रोल करू नका असे आवाहन आपल्या ट्वीटरवरून राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या विषयी अपमानास्पद भाषा वापरणे, वाईट वागणे टाळा. अशी मी सर्वांना विनंती करतो. असेही राहुल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. लोकांना अपमानीत करणे हे शक्तीचे नाही तर दुर्बलतेचे लक्षण आहे. असेही ते म्हणाले. त्यामुळ स्मृती इराणीच नाही तर अन्य नेत्यां बरोबर असे काही करून नका असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Advertisement
Advertisement

स्मृती इराणींनी बंगला ही सोडला 

भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी  दिल्लीतील आपला सरकारी बंगला खाली केला आहे. अमेठी लोकसभा मतदार संघातून त्यांचा पराभव झाला होता. शिवाय त्यांना नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानही मिळाले नाही. त्यामुळे नियमानुसार स्मृती इराणी यांना बंगला रिकामा करणे गरजेचे होते. गुरूवारी त्यांनी हा बंगला सोडला. गेल्या दहा वर्षापासून स्मृती इराणी या दिल्लीतील 28 तुगलग रोड वरील क्रीसेंट बंगल्यात रहात होत्या. नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर सर्व माजी केंद्रीय मंत्र्यांना त्यांचा बंगला रिकामा करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. लोकसभेत हरल्यानंतर त्या बंगला कधी खाली करणार याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत होती. अखेर त्यांनी बंगला खाली केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - स्मृती इराणी यांनी अखेर रिकामा केला सरकारी बंगला, नवीन घर कुठे मिळाले?

इराणींचा अमेठीतून मोठा पराभव 

अमेठी लोकसभा मतदार संघातून स्मृती इराणी यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात राहुल गांधी निवडणूक लढतील अशी अपेक्षा होता. पण त्यांच्या ऐवजी किशोरीलाल शर्मा यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे इराणी यांच्यासाठी निवडणूक सोपी असल्याची चर्चा होती. पण निवडणूक निकालात शर्मा यांनी इराणी यांना आस्मान दाखवले. जवळपास दिड लाखाच्या फरकाने स्मृती इराणी यांना पराभव सहन करावा लागला. खासदारकी गेली. पाठोपाठी मंत्रीपद ही गेलं. नंतर दहा वर्ष राहीलेला बंगलाही गेला. त्यावरून इराणी यांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वांनाच आवाहन केले आहे.  


 

Topics mentioned in this article