रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं जाणार?

नवनिर्वाचीत खासदार रविंद्र वायकर यांच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीत. त्यांचा विजय हा शंकेच्या गर्तेत अजूनही अडकलेला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचीत खासदार रविंद्र वायकर यांच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीत. त्यांचा विजय हा शंकेच्या गर्तेत अजूनही अडकलेला आहे. त्यांच्या विजयावर आता हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शाह यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट लोकसभा सचिव  उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवून वायकर यांना खासदारकीची शपथ देवू नये असे सांगितले आहे. उत्तर पश्चिम लोकसभेतील मतमोजणी ही पारदर्शक पणे झालेली नाही. त्यांचा विजय हा वादातील आहे. असे त्यांचे म्हणणे त्यामुळे त्यांना खासदारकीची शपथ देवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )     

ही नोटीस वकील असिम सरोदे यांच्या मार्फत पाठवण्यात आली आहे. ईव्हीएम मशिन मतमोजणी बाबत देशात पहिल्यांदाच एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे वायकर यांना आर्टिकल 99 नुसार खासदारकीची शपथ देता येणार नाही असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसे झाले तर संविधानाला अपवित्र करण्याचा तो प्रकार होईल असेही ते म्हणाले. या नोटीसमध्ये असाही उल्लेख आहे की अशी मागणी यापूर्वी कुणी केली नसेल. पण संविधानाचा उद्देश लक्षात घेता ही मागणी करत असल्याचे त्यात म्हटले आहे. वायकर यांचा विजय संशयाच्या गर्तेत आहे. अशा वेळी त्यांना खासदारकीची शपथ देणे योग्य ठरणार नाही असेही म्हटले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - बच्चू कडूंच्या पत्नीला कंत्राट, थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, प्रकरण काय?

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातली मतमोजणी नेस्को सेंटर इथे झाली. या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली. मात्र ते देण्यात आले नाही. या सर्व गोष्टी दबावातून होत आहेत असा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत आपण उच्च न्यायालयातही धाव घेणार असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement