रामराजे शिंदे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पुर्ण होत आहे. या निमित्ताने संघाने संपूर्ण देशात हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्ताने '100 वर्षांची संघ यात्रा – नवे क्षितिज' या अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 26, 27 आणि 28 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली होती. या वर्षी विजयादशमीला संघाचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. संघाने राष्ट्रसेवेचा संकल्प घेऊन आपले कार्य सुरु केले. गेली 100 वर्षे ते सातत्याने सुरु आहे असं यावेळी सुनील आंबेकर म्हणाले. शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या कार्याची आणि विचारांची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मालिकेतील एक भाग म्हणून दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असं ते म्हणाले.
नक्की वाचा - Sharad Pawar Vs BJP: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार
हा कार्यक्रम 26, 27 आणि 28 ऑगस्ट रोजी दररोज सायंकाळी साडेपाच वाजता होईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं. यात संघ चालक संघाची पुढची दिशा काय असेल यावर मार्गदर्शन करतील. शिवाय संघाची स्थापनेपासूनची भूमीका आणि योगदान काय असेल हे ही सांगतील. असं कार्यक्रम देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केले जाणार आहेत. त्यात हजार पेक्षा जास्त व्याख्यानं ठेवण्यात आली आहे. दिल्ली प्रमाणे बेंगळुरू, कोलकाता आणि मुंबई येथेही असेच कार्यक्रम होणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
OBC Mandal Yatra: ओबीसींच्या जागरासाठी 'मंडल यात्रा', भाजपच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची फिल्डिंग
या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडतील. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्रश्नोत्तर सत्र होणार आहे. मात्र हे प्रश्न आधीच लिखीत स्वरूपात घेतले जातील असं ही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी समाजातील 17 प्रमुख घटकांतील प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचण्याचा संघाचा प्रयत्न आहे. सनातन परंपरेनुसार जे विचार आहेत. ते पुनर्रप्रस्थापीत करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. त्या गोष्टी समाजात ठेवण्याचा संघाचा प्रयत्न असेल असं ही सुनिल आंबेकर यांनी सांगितलं. संघाचं कार्य, विचार, आगामी काळात संघ कोणत्या गोष्टी पुढे घेवून जाणार आहेत. त्यावरही या कार्यक्रमात विचार मंथन होणार आहे.