'रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का?',अंधारे-चाकणकर यांच्यात जुंपली, एकमेकींना थेट...

पुढे बोलताना त्यांनी चाकणकरांना टोला लगावला. अनेकांना फार गोड गैरसमज आहेत असं ही अंधारे म्हणाल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Rupali Chakankar rashmika mandanna: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या एकमेकींना चांगल्याच भिडल्या आहेत. महिला आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते असं वक्तव्य चाकणकर यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार अंधारे यांनी घेतला आहे.  चाकणकर कोण आहेत? रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? असा प्रश्न करत त्यांनी चाकणकर यांच्यावर पलटवार केला. मविआच्या महिलांचे एक शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटले. राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत एक निवेदन राज्यपालांना देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 राज्यपालांची भेट झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांचा समाचार घेतला. रुपाली चाकणकर या कोण आहे. त्या रश्मिका मंदाना आहेत का? का त्या स्मृती इराणी आहेत? असा खोचक सवाल त्यांनी केला. जेणे करून त्यांच्यावर टीका केली तर आम्हाला प्रसिद्धी मिळेल अशी विचारणा ही त्यांनी केली. शिवाय त्या कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रिमो आहेत. त्या बॉलिवूडच्या सुप्रिमो आहेत की  राजकारणातल्या सुप्रिमो आहेत. जेणे करून त्यांच्यावर आम्ही बोलावे आणिनंतर आम्हाला प्रसिद्धी मिळावी असं ही त्या म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad: वाल्मिक कराडच्या सुटकेवर 'या' दिवशी होणार युक्तीवाद, कोर्टात आज काय काय घडलं?

पुढे बोलताना त्यांनी चाकणकरांना टोला लगावला. अनेकांना फार गोड गैरसमज आहेत. त्यांनी या अंधश्रद्धेतून बाहेर पडले पाहीजे. त्यासाठी त्यांच्या बाजून तातडीने पुढे आलेले त्यांचे भाऊ सुनिल तटकरे यांनी आपल्या या लाडक्या बहीणीला या अंधश्रद्धेतून बाहेर काढले पाहीजे. आमच्यासाठी चाकणकर हा विषय अंत्यंत छोटा विषय आहे. आम्हाल महिला सुरक्षा, गायब होत असलेल्या महिला, हगवणे केस सीआयडीकडे देणे हे विषय आम्ही राज्यपालांकडे मांडले. त्यांनी ही आम्हाला चांगला प्रतिसाद दिला असंही अंधारे यावेळी म्हणाल्या. 

ट्रेंडिंग बातमी-  Nashik News : आधी मुख्यमंत्र्यांची भेट, आता उघड नाराजी; सुधाकर बडगुजरांच्या मनात चाललंय काय?

राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, वैष्णवी हगवणे प्रकरण यामुळे महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी त्यांच्या विरोधात आघाडी खोलली आहे. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. शिवाय त्यांना पदावरून काढलं पाहीजे अशी ही मागणी केली जात आहे. मात्र आपल्यावर आणि महिला आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी करत विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष्य केलं.