संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय मिळाला यासाठी परभणीतही जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. सर्व पक्षाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचे रुपांतरनंतर जाहीर सभेत झाले. या सभेला संबोधित करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार टोलेबाजी करत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली. शिवाय थेट अजित पवारांना या प्रकरणात ओढत क्या हुवा तेरा वादा असा खडा सवाल केला. यावेळी त्यांनी एकामागून एक आरोप करत या प्रकरणातल्या आरोपींना मोक्का लावाला अशी मागणी ही केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोण कलाकार मंडळी होते ते आता समोर आले आहे. या प्रकरणाची आता चौकशी होत आहे. मुख्यमंत्र्यांना जी मागणी केली होती ती पूर्ण केली आहे. असं भाजप आमदार सुरेश धस यावेळी म्हणाले. पोलिस चौकशीत जर का चुकून हे आरोपी सुटले तर त्यांना मोक्का लावला पाहीजे.जर का यांना मोक्का लावला तर एकदा का ते आत गेले की पाच सहा वर्ष नमस्ते लंडन... परत ते काही माघारी येत नाहीत असं सुरेश धस यांनी सांगितलं. या प्रकरणात आका तर आत गेलाच पाहीजे. पण आकाच्या आकाने जर काही यात केलं असेल तर तो आत गेलाच समजा असं सुचक इशाराही सुरेश धस यांनी या वेळी दिला.
ट्रेंडिंग बातमी - वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात ?
माणसं मारण्याचे यांचे धंदे आहेत. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजेंची हालहाल करुन हत्या करण्यात आली, त्याच प्रमाणे संतोष देशमुख यांना क्रुरपणे मारण्यात आलं. आमच्या लेकरानं तुमचं काय बिघडवलं होतं, असा सवाल त्यांनी यावेळी केला. संतोषला मारहाण होत असतानाचा व्हिडीओ आकाने पाहीला आहे. तोच व्हिडीओ जर आकाच्या आकाने पाहिला असेल तर कर लो जल्दी तयारी, अब निकलेगी जेल वारी, असा सुचक इशारा त्यांनी वाल्मिक कराडच्या आकालाही दिला आहे.
यानंतर धस यांनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. सौ चुहे खाके बिल्ली चले हज असा प्रकार धनंजय मुंडे यांच्याबाबत झाला आहे. ते म्हणतात या प्रकरणात दोषी आहेत त्यांना फाशीची शिक्षा करा. असं होतं तर मग आधीच या सर्वांना निट वागायला का सांगितलं नाही असा प्रश्न धस यांनी केला. शिवाय त्यांनी यावेळी अजित पवारांनाही चिमटे काढले. अजितदादा क्या हुवा तेरा वादा अशी विचारणा त्यांनी या निमित्ताने केली.
ट्रेंडिंग बातमी - Crime news: गॅलरीत टॉवेलवर फिरला, गावकऱ्यांनी उघडा करून मार- मार मारला
क्या हुवा तेरा वादा म्हणत काही को उसको अंदर लिया रे. अंदर लेने का जैसा नही है वो. असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का घेतलं? ते मंत्रिमंडळात घेण्यासारखे नव्हते असं धस यांनी सुचित केलं. बीडमध्ये झालेल्या हत्यांचा अजितदादा जरा हिशोब करा. हे उद्योग कुणी केले? संदीप दिघोळे पासून संतोष देशमुखपर्यंत हत्येची बेरीज करा. या हत्या कुणी केल्या हे जर तुम्हाला माहित नसेल, या मागचा मास्टर माईंड माहित नसेल तर तुमची माणसं परभणीला पाठवा. बारामतीची माणसं परळीत पाठवा. इथं इतर समाजाच्या लोकांना काय वागणूक दिली जाते हे समजेल. अनेक कुटुंब या त्रासाला कंटाळून गाव सोडून गेले आहेत. त्या मागे कोण आहेत ते शोधा. आमच्या जिल्हा बिनमंत्र्याचा राहीला तरी चालेल. लोक खुश राहतील असंही ते म्हणाले.