बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मग त्यांची कृती असो की वक्तव्य असो, वाद हा होणारच. त्यामुळे संजय गायकवाड आणि वाद हे जणू समिकरण बनले आहे. आता आमदार संजय गायकवाड यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्याला निमित्त ठरलं आहे ते त्यांच्या लेकाचा वाढदिवस. त्यांनी त्याच्या वाढदिवसाला आणलेला केस हा तलवारीने कापला. बरं ते त्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तो केकही लेकाला तलवारीनेच भरवला. त्याने त्यांचे मन भरले नाही. तर आपल्या पत्नीलाही त्यांनी तलवारीनेच केक भरवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला. कापलेला केक तलवारीनेच पत्नीला भरवला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होत आहे.
सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होतो. मात्र आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापलाच. पण पत्नीसह मुलालाही तलवारीनेच केक भरवला. त्याचा व्हिडीओही आता समोर आला आहे. तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. मागच्या काळात पोलीस प्रशासनाने असे गुन्हे काही लोकांवर दाखल केले. ते माझ्या मते चुकीचे आहेत असे ही गायकवाड सांगून मोकळे झाले.
(नक्की वाचा- शिवसेना नेत्याचं काँग्रेसमधून निलंबन; पक्षात नसतानाही पक्षविरोधी काम केल्याचा ठपका)
तलवारीचा वापर कोणाला मारण्यासाठी केला. धमकावण्यासाठी केला. किंवा दंगलीमध्ये केला असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल होऊ शकतो, असं सांगायला ते विसरले नाही. राजकीय पुढार्यांना तलवारी गिफ्ट दिल्या जातात. त्या आपण जनतेला दाखवतो. मुख्यमंत्री तलवार जनतेला दाखवतात. तलवार बहादुरीचे प्रतीक आहे. म्हणून ते दाखवले जाते. तलवार दाखवण्याने जर गुन्हा होतो तर पोलीस परेडमध्ये एखादा डीवायएसपी हजारोच्या गर्दीला तलवार दाखवतो. तो काय गुन्हा ठरतो का? असा उलट प्रश्नच त्यांनी केला.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
असं असेल तर मग ऑलम्पिकमध्ये असलेले काही खेळ बंद करावे लागतील. त्यात नेमबाजी, तलवारबाजी बंद करावी लागेल. जर तलावारीने कोणाला मारण्याचा इजा पोहोचवण्याचा उद्देश असेल तर आवश्य गुन्हा दाखल झाला पाहीजे. पण तसे काहीच नसेल तर गुन्हा कसा होवू शकतो असा प्रश्न या निमित्ताने त्यांनी केला आहे. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या याकृतीची मतदार संघात जोरात चर्चा सुरू आहे.