'हिंमत असेल तर राजीनामा देऊन दाखवा' भुजबळांना भिडणारा नेता कोण?

सुहास कांदे हे छगन भुजबळांचे कट्टर विरोधक समजले जातात. भुजबळांनी महायुती बरोबर जी गद्दारी केली त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. असं सुहास कांदे म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

छगन भुजबळांना महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून संधी मिळाली नाही. त्यानंतर ते नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी जाहीर पणे बोलूनही दाखवील. त्यासाठी त्यांनी अजित पवारांवर ही निशाणा साधला. नागपूरमध्ये विधीमंडळाचे अधिवेनश सुरू असताना त्यांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवील. त्यांनी मतदार संघात येऊन संघर्ष सभेचे आयोजन केले. त्यात त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. शिवाय बंडखोरीचेही संकेत दिले. त्यानंतर नाशिकमधील त्यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुहास कांदे हे छगन भुजबळांचे कट्टर विरोधक समजले जातात. भुजबळांनी महायुती बरोबर जी गद्दारी केली त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. असं सुहास कांदे म्हणाले. त्यांच्याबाबत आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यांनी आधी लोकसभेला आणि नंतर विधानसभेला महायुतीचे काम केले नाही. त्याचेच फळ त्यांना मिळाले. त्यांच्यात जर हिंम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन दाखवावा असे आव्हान ही कांदे यांनी यावेळी दिले. ते नागपूरात हिवाळी अधिवेशना वेळी एनडीटीव्ही मराठी बरोबर बोलत होते. 

ट्रेंडिंग बातमी - छगन भुजबळांचा एल्गार! अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकले; संघर्ष मेळाव्यातून मोठी घोषणा!

छगन भुजबळांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभेत महायुतीचे काम केले नाही. विधानसभेला आपल्या विरोधात पुतण्याला अपक्ष म्हणून मैदानात उतरवलं. मंत्री केलं नाही म्हणून त्यांची सध्या आगपाखड सुरू आहे. ओबीसी ओबीसी ते आता करत आहेत. भुजबळांना दिलं म्हणजे ओबीसींनी दिलं असं काही आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन दाखवावं. त्यांनी राजीनामाही देऊन दाखवावाच असं ही ते म्हणाले. त्यांनी निर्णय घेऊन दाखवावाच. त्यांच्या निर्णय घेण्याची हिंम्मत नाही असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - खाते वाटपावरुन भाजपमध्ये स्पर्धा? चंद्रशेखर बावनकुळे- विखे पाटलांमध्ये रस्सीखेच, वाचा संभाव्य फॉर्म्युला

भुजबळ हे सध्या दबावाचे राजकारण करत आहेत. पण त्यांच्या दबावाच्या राजकारणाला कुणीही आता भिक घालणार नाही. त्यांना जर मंत्री केलं असतं तर अजित पवार चांगले झाले असते. महायुती चांगली झाली असती असंही कांदे म्हणाले. भुजबळांचे आता 79 वर्ष वय झालं आहे. आता त्यांना शांत बसलं पाहीजे. बाकीच्या ओबीसींना पुढे येवू दिलं पाहीजे. तुम्ही स्वताला स्वयंघोषित ओबीसी नेते समजू नका. भुजबळ म्हणजे ओबीसी असं काही नाही. त्यांनी गद्दारी केली त्याचे फळ त्यांना मिळाले असंही कांदे यावेळी म्हणाले. दरम्यान भुजबळां विरोधातला आपला लढा आपण असाच सुरू ठेवणार आहे. त्यांना जेलमध्ये टाकल्या शिवाय आपण शांत बसणार नाही असंही ते म्हणाले. 

Advertisement