कुणाल कामराच्या कवीतेमुळे राज्याचं राजकारण चांगलचं ढवळून निघालं आहे. या कवीतेतून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं होतं. ठाकरे गटाच्या नेत्यांनी कामराची ही कवीता उचलून धरली तर शिंदेंच्या शिवसैनिकानी त्याला विरोध करत जोरदार राडा ही केला. त्याचे पडसाद विधीमंडळातही उमटले. यानंतर आता कवीतेला कवीतेने उत्तर देण्याची भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे. कुणाल कामराची कवीता जितकी जोरदार होती तितक्याच ताकदीची कवीत शिंदे गटाने केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी ही कविता सादर केली आहे. यातून त्यांनी कामरासह ठाकरे गटाला झोडून काढलं आहे. पण एकनाथ शिंदे काय आहेत हे ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी कवितेला कवितेतून शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर दिलं आहे. ती कविता नक्की काय आहे त्यावर एक नजर टाकूयात.
भांडुपका भामटा
सुबह की प्रेस
माईक देखते ही भोंके हाय हाये
बांद्राका बंदर
हिंदुत्व को बेचकर
CM की कुर्सी को ललचाये हाय हाये
इन कमिनो को मिट्टी मे मिलाने भगवा झेंडा फहराये
जनता की नजर से तुम देखो
ठाणे का टायगर नजर आये
चेहरे पे दाढी
आखो मे शोले
तांडव करे
जैसे शंभू भोले
उनकी दहाड सुनकर ये चुहे
बिलमे जाके छूप जाये
जनता की नजरसे तुम देखो
ठाणे का टायगर नजर आये..
ही कविताही आता चांगलीच व्हायरल होत आहे. या कवितेतून शिंदे गटाने ठाकरे गटावर कुरघोडी केली आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे वाघ आहेत असंही यात म्हटलं आहे. त्यांची डरकाळी ऐकून बाकीचे लोक बिळात लपतात असंही यात म्हटलं आहे. तर कुणाल कामरा याने केलेल्या कवितेत त्यांने शिंदे याचे नाव जरी घेतलं नसलं तरी त्यात गद्दार असा उल्लेख केला आहे. त्याल जशाच तसे प्रत्युत्तर मात्र शिंदे गटाने दिले आहे.