Shivsena Rada: शिंदेंच्या उपशहर प्रमुखाला महिलेने कानफटवले, शिंदेंच्या सेनेत चाललंय काय?

अहिल्या बाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले आमने सामने आले. राणी कपोते यांनी तू मला शिव्या का देतो माझ्यासोबत गैरवर्तन काय करतो. असं म्हणत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला.

जाहिरात
Read Time: 3 mins
कल्याण:

अमजद खान 

रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या श्रेयाचा वाद इतका वाढला की कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटात तो हाणामारीपर्यंत पोहोचला. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या राणी कपोते यांनी शिवसेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांना रस्त्यात गाठत थेट कानशिलात लगावली. एक कानशिलात लावून त्यांचा हात काही थांबला नाही, त्या अर्धा तास मोहन उगले यांना  मारहाण करत होत्या. यावेळी लोकांनी ही बघ्याची भूमिका घेतली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता. हा कार्यक्रम काल सायंकाळी होता. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता. त्याठिकाणी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.  त्याठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते पोहचल्या. त्यांनी सांगितले की, या कामाचा पाठपुरावा मी केला आहे. त्यानंतर त्याठिकाणी जोरदार गोंधळ झाला. त्यावर माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा मी केला असल्याचा दावा केला होता. हा राग राणी कपोते यांनी मनात धरला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल

आज दुपारी अहिल्या बाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले आमने सामने आले. राणी कपोते यांनी तू मला शिव्या का देतो माझ्यासोबत गैरवर्तन काय करतो. असं म्हणत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला. यात उगले यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. राणी कपोते यांनी उगले यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. हा वाद इतका टोकाला पोहोचेल असं कुणाला वाटलं नव्हतं. महिला आहे म्हणून आपण काही केलं नाही असं उगले यावेळी म्हणाले. आम्ही महिलांचा सन्मान करतो असंही ते म्हणाले. शिवाय त्यांना मारहाण होत असताना बघ कशी पद्धतीने मारहाण होत आहे असं ते बोलत होते. त्याचाही व्हिडीओ समोर आला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shivsena news: शिंदेंचे शिलेदार एकमेकानाच भिडले, भर रस्त्यात राडा, कल्याणमध्ये नेमकं काय झालं?

दरम्यान प्रकरणावर कार्यकर्ता कोणाचा ही असो ही घटना चुकीची आहे. पोलिसांनी ठोस कारवाई केली पाहिजे असे कल्याण शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचे म्हणणे आहे. ज्या पद्धतीने हल्ला झाला ते चुकीचे आहे. त्याचे कुणीही समर्थन करणार नाही. ती महिला असो की पुरूष मारहाण करणे योग्य नाही असं ही ते म्हणाले. याबाबत आता पोलिसांनी योग्य कारवाई केली पाहीजे असं सांगत त्यांनी कारवाईचा चेंडू पोलिसांच्या कोर्टात ढकलला आहे. मात्र कल्याण शिवसेना शिंदे गटात वाद मात्र विकोपाला गेला आहे. आगामी महापालिका निवडणूकीत याचा फटका बसण्याचंही बोललं जात आहे. 

Advertisement