​Karnataka News: सिद्धरामय्या जाणार की राहणार? काँग्रेसच्या दिल्लीतील मॅरेथॉन बैठकीत काय ठरलं?

दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चांनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या पदावर कायम राहणार
  • दिल्लीत काँग्रेस हाय कमांडच्या बैठकीत आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांवर चर्चा झाली
  • काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी मंत्रिमंडळ विस्तार किंवा नेतृत्व बदलाचा अजेंडा नसलाचं स्पष्ट केलं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

कर्नाटक काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या चर्चा अखेर फेटाळून लावण्यात आल्या आहेत. दिल्लीत पार पडलेल्या हाय-व्होल्टेज बैठकांनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच आपल्या पदावर कायम राहतील, हे स्पष्ट झाले आहे. या बैठकांचा मुख्य अजेंडा आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद (MLC) निवडणुका हाच होता, असे काँग्रेस हाय कमांडकडून सांगण्यात आले. त्यामुळे सध्या तरी सिद्धरामय्या यांची खुर्ची वाचली आहे. 

दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, ही मॅरेथॉन बैठक केवळ आगामी राज्यसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आली होती. केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार किंवा नेतृत्व बदलाचा कोणताही विषय अजेंड्यावर नव्हता. माध्यमांमध्ये येणाऱ्या इतर चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही असं स्पष्ट करत सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील असं त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Beed News: लग्न ठरलं, खर्च झाला, मंडप सजला! त्याच वेळी PSI नवऱ्याने दगा दिला, कारण समोर येताच...

मंगळवारी झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रथम मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांशी वन-टू-वन (वैयक्तिक) चर्चाही करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका गांधी देखील या प्रक्रियेत सक्रिय होत्या. मात्र, बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले की, मंत्रिमंडळ बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही आणि ते तातडीने बेंगळुरूकडे रवाना झाले.

Advertisement

नक्की वाचा - Buldhana News: बोथा जंगलातून जात असाल तर सावधान, रस्त्यावर गावकऱ्यांना जे दिसले त्याने धडकी भरेल

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? डीके शिवकुमार यांच्याकडे सत्ता सोपवली जाणार? गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या या सर्व चर्चांची हवा काँग्रेसने एका रात्रीत काढली आहे. दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या हाय-व्होल्टेज बैठकीनंतर सिद्धरामय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कर्नाटक काँग्रेसमध्ये सरळ सरळ दोन गट आहे. एक गट सिद्धरामय्या यांचा तर दुसरा गट डीके शिवकुमार यांचा आहे. डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.