समाजवादी पक्षाचे नेते सध्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत आहेत. यापूर्वी रामजी राम यांनी राणा संग यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्याचा वाद अजूनही शांत झालेला नाही. त्यापाठोपाठ समाजवादी पक्षाचे सरचिटणीस इंद्रजीत सरोज (SP Leader Indrajeet Saroj On Temples) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमातील त्यांच्या वक्तव्यानं वाद सुरु झाला आहे.
सरोज यांनी या कार्यक्रमाबाबत मंदिरांबाबत संतापजनक वक्तव्य केलं. त्यांनी यावेळी बोलताना मंदिराच्या शक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला. मंदिरांमध्ये शक्ती असती तर गझनी आणि मोहम्मद घोरी इथं येऊन देश लुटून गेले नसते, असं वक्तव्य सरोज यांनी केलं. त्यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही नाव न घेता टीका केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंदिराच्या शक्तीवर प्रश्न
सरोज यांनी यावेळी सांगितलं की, 'देशातील मंदिरांमध्ये शक्ती असती तर मोहम्मद बिन कासिम, मोहम्मज गझनी आणि मोहम्मद घोरी आले नसते. त्यांनी देश लुटला नसता. याचाच अर्थ मंदिरांमध्ये शक्ती नाही. सत्तेच्या मंदिरामध्ये शक्ती असते. त्यामुळेच आज बाबा मंदिर सोडून सत्तेच्या मंदिरात विराजमान आहेत, अशी टीका सरोज यांनी केली.
( नक्की वाचा : Tahawwur Rana : पाकिस्तानी लष्कर, ISI आणि भारतविरोध पहिल्याच दिवशी राणानं सांगितली कोणती रहस्य? )
तुलसीदास दलितविरोधी
इंद्रजीत सरोज इथंच थांबले नाहीत. त्यांनी संत तुलसीदास यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी तुलसीदास यांच्या लेखनावर प्रश्न उपस्थित केला. तुलसीदास हे दलित शिक्षणाच्या विरोधात होते. त्यांनी दलितांची तुलना सापाशी केली होती, असा दावा सरोज यांनी केला.
सरोज यांच्या वक्तव्यावर भाजपानं टीका केली आहे. मोहम्मद घौरी, औरंगजेब हे गद्दारीमुळे भारतामध्ये आले होते. देशात आजही गद्दार जिवंत आहेत. त्यामुळेच ते असं वक्तव्य करतात, अशी टीका भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दयाशंकर यांनी केली.